येवला : बैल धुताना वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

0

विखरणी, ता. येवला (वार्ताहर) : काल दुपारी  बाराच्या सुमारास पालखेड कालव्यात पाटोदा येथून वाहून गेलेल्या गोकुळ तनपुरे ( १७) या युवकाचा मृतदेह आज सकाळी सापडल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

घटनास्थळापासून दोन ते तीन की मी अंतरावर येवला पाटोदा राज्यमार्गालगत पंडित यांच्या वजनकाट्याजवळ हा मृतदेह आढळून आला आहे.

आज सकाळी काही महिला प्रातर्विधीसाठी जात असताना त्यांना मृतदेह दिसून आला. परिसरात ही बातमी कळल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.

सदर मृतदेह त्वरीत येवला येथील जिल्हा उपरुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला असून पोस्टमार्टेम नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

एकुलता एक मुलगा गेल्याने परिवारासह संपूर्ण आडगाव रेपाळ वर शोककळा पसरली असून आज आडगाव सह पाटोदा येथील व्यवहार बंद असण्याची शक्यता आहे.

पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या मुलगा पाटात वाहून गेला

LEAVE A REPLY

*