रामवाडी पुलानजीक आढळला मृतदेह; अंगावर वार करून जाळण्याचा प्रयत्न

0

नाशिक : नाशिकमध्ये गुन्हेगारीने चांगलेच डोके वर काढले आहे. कालचा खून ताजा असतांना आज सकाळी रामवाडी पुलानजीक मनपा कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सदर व्यक्तीची ओळख पटली असून अज्ञात हल्लेखोरांनी गोदापात्रात फेकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले.

उदय कॉलनीमधील रहिवासी महापालिका आरोग्य विभागातील कर्मचारी अरूण बर्वे असे मयत इसमाचे नाव आहे.

या घटनेतील सर्व संशयित फरार आहेत याबाबत अधिक तपास पोलीस यंत्रणा करीत आहे.

मनपा कर्मचारी बर्वे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी पाठीवर, डोक्यावर, पोटावर धारधार शस्त्राने वार केल्याचे पंचनाम्यात आढळून आले आहे.

LEAVE A REPLY

*