Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या सार्वमत

दौंड-मनमाडसाठी 370, नगर-परळीसाठी 550 कोटींचा निधी

Share

नाशिक-संगमनेर-पुणे रेल्वे मार्गासाठी अवघा 10 लाखांचा निधी

मुंबई – मोदी सरकारने नुकत्याच सादर केेलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात नवीन रेल्वे प्रकल्पांसाठी जाहीर केलेल्या निधीची आकडेवारी रेल्वे विभागातर्फे बुधवारी जाहीर करण्यात आली. त्यात दौंड-मनमाड दुहेरीकरणाच्या कामासाठी 370 कोटी रूपये, अहमदनगर- बीड- परळी या निर्माणाधीन मार्गासाठी 550 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर नाशिक-संगमनेर-पुणे या मार्गाच्या सर्वेक्षणाच्या कामासाठी 10 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

दौंड-नगर-मनमाड या रेल्वे मार्गाच्या 247 किलोमीटर लांबीच्या या दुहेरीकरणाच्या कामावर दोन हजार 350 कोटी 51 लाख रुपये खर्च करण्यात येणार असून, 2021-22 या वर्षापर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे. या मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामास वेग देण्यात आला आहे.

उत्तर भारतातून दक्षिण भारतात जाणार्‍या रेल्वे वाहतूक मार्गातील दौंड-मनमाड रेल्वे मार्ग महत्त्वाचा आहे. हा मार्ग एकेरी वाहतुकीचा असल्याने यावरील रेल्वे वाहतूक संथ गतीने सुरू असते. शिर्डी व शनिशिंगणापूर या धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी देशभरातून येणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी या मार्गाचे दुहेरीकरण आवश्यक असल्याची मागणी होती. शिवाय असे झाल्यास प्रवासी व मालवाहतुकीस त्याचा फायदा होईल, असे म्हणणे केंद्र सरकारकडे मांडले गेले होते. त्यामुळे 2015 मध्ये केंद्र सरकारने या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या सर्व्हेसाठी नऊ कोटी 37 लाख रुपयांची तरतूद केलेली होती.

यातील विद्युतीकरणाचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. अन्य कामेही जोमाने सुरू आहेत. यावर्षासाठी 370 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे.
नगर- बीड- परळी या अनेक वर्षांपासून रखडत पडलेल्या 250 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाला मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात 2014 पासून चालना देण्यात आली. या कामाने दोन्ही बाजूंनी वेग घेतला असून आता मिळालेल्या भरीव निधीमुळे 2020 पर्यंत हा रेल्वे मार्ग पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!