शेवगावातील मंदिरे दत्त नामाच्या जयघोषाने दुमदुमली

0
शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – शहरातील दादाजी वैशंपायन नगरमधील श्रीदत्त मंदिर, आखेगाव रोड व नेवासा रोडवरील महावितरणच्या कार्यालयात, पोलीस ठाणे, पंचायत समिती तसेच तालुक्यातील सामनगाव, ठाकुर निमगाव, अमरापूर, गुंफा यासह विविध ठिकाणच्या दत्त मंदीरामध्ये विविध कार्यक्रमांनी दत्त जयंती उत्सहात साजरी करण्यात आली. शहरासह तालुक्यातील सर्व मंदीरे सकाळपासुन दत्त नामाच्या जयघोषाने दुमदुमुन गेली होती.
शहरातील आखेगाव व नेवासा रोडवरील महावितरणच्या कार्यालयामधील दत्तमंदीरात रामकृष्ण महाराज ढगे यांचे प्रवचन झाले. यावेळी बाबा वाकडे, माऊली बडधे, बंडू दहातोंडे, प्रदीप बोडखे, अर्जुन नजन, उत्तम खरड, अनिल सर्जे, कचरु अडसरे आदींनी मोठे योगदान दिले. पाथर्डी रस्त्यावरील वैशंपायन नगरमधील श्रीदत्त मंदिरात पारायण, दत्तयाग, श्रीसत्य दत्त महापूजा, पालखी सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते.
बालाजी देवस्थानचे कर्जत येथील दयानंद कोरेगावर यांचे श्रीदत्त जन्मावर कीर्तन झाले. भगवान धुत, मंगल धूत व निवृत्ती गोरे, शोभा गोरे या जोडप्यांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढून जन्मोत्सव साजरा केला. पुरुषोत्तम धुत यांच्यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अर्जुनराव फडके, सचिव फुलचंद रोकडे, पी. बी. शिंदे, लक्ष्मण काळे, प्रवीण आठरे, बाबू जोशी, दिलीप फलके, विष्णू दौंड, जगन्नाथ गोसावी आदींसह भाविक उपस्थित होते.
पोलीस ठाण्यात श्रीदत्त जयंती निमित्त ठाण्यातील कर्मचारी संगीता व रामेश्वर घुगे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पौर्णिमा तावरे, यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. बसस्थानकामधील दत्तमंदिरात दिनकर महाराज अंचवले यांचे कीर्तन झाले. पंचायत समिती मधील दत्तमंदिर येथे महप्रसाद वाटप करण्यात आले.
शहराप्रमाणेच तालुक्यातील सामनगाव येथील नजन वस्ती, अमरापूर येथील दत्तमंदिर, गुंफा येथील दत्तमंदिर, ठाकूर निमगाव येथील दत्तमंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाने दत्तजयंती साजरी करण्यात आली. यावेळी दत्त मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

 

LEAVE A REPLY

*