देवगड येथे आज लाखो भाविकांच्या उपस्थितीत दत्त जन्मोत्सव

0
देवगड फाटा (वार्ताहर) – श्रीक्षेत्र देवगड येथे आज 3 डिसेंबरला होणार्‍या दत्त जयंती महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून देवगड येथे आज सायंकाळी 6 वाजता दत्त जन्म सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे.
श्री क्षेत्र देवगड गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख गुरुवर्य महंत भास्करगिरी महाराज यांच्या उपस्थितीत दत्त जन्म सोहळा साजरा होणार आहे. या प्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे तसेच राज्यातून साधूसंत, महंत, राजकीय, प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
यात्रा काळात सर्व ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक लोखंडे यांनी सांगितले. नगर, नेवासा, गंगापूर, पैठण, औरंगाबाद आदी एसटी आगाारातून यादा बस गाड्या सोडण्यात येणार आहे. तहसीलदार उमेश पाटील, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे व यात्रा कमिटी सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली यात्राचे सर्व नियोजन केले आहे.

बस पार्किंग, मोटारसायकल पार्किंग, चारचाकी पार्किंग वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. काही खासगी जागा असणार्‍या शेतकर्‍यांना पार्किंगचे नियोजन करण्यास सांगितले आहे व सर्वाना पार्कींग नियमावली सांगण्यात आली आहे. देवगडचा दत्त जयंती उत्सव हा सर्वात मोठा उत्सव असतो. 27 नोव्हेबर ते 4 डिसेंबर या वेळेत दत्त जयंती महोत्सव साजरा होत आहे. सप्ताह काळात विविध धार्मिक कार्यक्रम होतात सोहळ्याची सांगता 4 डिसेंबर रोजी महंत भास्करगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.

देवगड येथे दत्त मंदिर, समर्थ किसनगिरी बाबा समाधी मंदिर व इतर मंदिरावर तसेच इतर मुख्य ठिकाणी डोळ्याचे पारणे फेडणारी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने देवगड लखलखले आहे.

 

LEAVE A REPLY

*