नवी दिल्ली : आधार लिंकिंगला मार्चएण्डची डेड लाईन

केंद्राची सुप्रीममध्ये माहिती

0

आधार कार्ड बँक खाते, मोबाईल व विविध कल्याणकारी योजनांसाठी जोडण्याची मुदत 31 मार्च 2018 पर्यंत वाढविली जाणार असल्याची माहिती केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात आज दिली.

मात्र ही मुदतवाढ ज्याच्याकडे आधार नाही त्यांच्याचसाठी असेल असे स्पष्टीकरण अ‍ॅटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी दिले. यासंदर्भात केंद्र सरकार 8 डिसेंबरला अधिसूचना काढणार असल्याचे त्यांनी कोर्टाला सांगितले.

कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार बँक खाते, मोबाईल व इतर सेवांना आधार लिंक करणे केंद्र सरकारने बंधनकारक केले असून त्यासाठी 31 डिसेंबर डेडलाईन दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात याचिकेद्वारे विरोध करण्यात आला असून त्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.

मोबाईल नंबरला आधार लिंक करण्याची मुदत 6 फेब्रुवारी 2018 हीच असणार आहे. सरकार फक्त कल्याणकारी योजनेंसाठीची मुदतवाढ देण्याच्या तयारीत असून अन्य योजनांना मुदताढ देणार नसल्याचे याचिकाकर्त्यांचे वकिल शाम दिवाण यांनी कोर्टात सांगितले.

आधार लिंक करण्याची 31 डिसेंबर मुदत फारच जवळ आली असून तिला मुदतवाढ देण्याची मागणी यावेळी करण्यात आला. त्यावर अ‍ॅटर्नी जनरल वेणूगोपाल यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. आधार लिंक करण्याची प्रक्रिया पुढे गेली असून ती मागे घेता येणार नाही असे वेणुगोपाल यांनी यावेळी सांगितले.

विविध याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी 5 सदस्यांचे घटनापीठ स्थापन करण्यात येईल असे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सांगितले. पुढील आठवड्यात त्यावर सुनावणी होणार आहे.

 

LEAVE A REPLY

*