जिल्ह्यात 452 ग्रामपंचायती दारूबंदीसाठी सरसावल्या

0

ग्रामरक्षक दल स्थापन करण्यासाठी केले ठराव, अकोलेची आघाडी

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील 1 हजार 311 ग्रामपंचायतींपैकी अवघ्या 452 ग्रामपंचायतींनी गावात ग्रामरक्षक दल स्थापन करण्याचा ठराव केले आहेत. या ग्रामरक्षक दलाच्या माध्यमातून रात्रीच्या वेळी गावात होणारी अवैध दारूची चोरटी वाहतूक थांबवण्यात येणार आहे. ग्रामरक्षक ठराव करण्यात जिल्ह्यात अकोले तालुक्याने आघाडी घेतली आहे.

तालुक्यातून 100 ग्रामपंचायतींनी हे ठराव घेऊन त्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला त्याची माहिती कळवली आहे.जिल्ह्यात दारूबंदी करण्यासाठी व्यापक चळवळ उभी राहत आहे. त्याला सरकारकडून जोड म्हणून संबंधित गावाने गावात ग्रामरक्षक दल स्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

त्याला ग्रामीण भागात फारसा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या वतीने ग्रामरक्षक दल स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. लवकर महसूल विभागाच्यावतीने प्रातांधिकारी यांच्या मार्फत जिल्ह्यातील ज्या गावात ग्रामरक्षक दल स्थापन करण्याचे ठराव झालेले नाहीत. त्या ठिकाणी ठराव घेण्यासाठी ग्रामसभा बोलावण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात ग्रामरक्षक दल स्थापन करून त्या ठिकाणी दारूबंदी विरोधात चळवळ उभी करण्यासाठी अकोले तालुक्याने आघाडी घेतली आहे. अकोले तालुक्यातील 100 गावांत हे ठराव झालेले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघात येणार्‍या जामखेड तालुक्यातील अवघ्या 2 गावांनी आणि कर्जत तालुक्यातील 27 गावांत हे ठराव झालेले आहेत.

तालुकानिहाय झालेले ठराव
अकोले 100, संगमनेर 42, कोपरगाव 49, राहुरी 36, राहाता 4, श्रीरामपूर 30, नेवासा 9, शेवगाव 54, पाथर्डी 7, जामखेड 2, कर्जत 27, श्रीगोंदा 52, पारनेर 26 आणि नगर 14 यांचा समावेश आहे.

 जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील 17 गावात महिलांनी पुढाकार घेत ग्रामरक्षक दल स्थापन करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीला पत्र अथवा निवेदन दिलेली आहेत. जिल्ह्यात अशा प्रकारे कोणत्याच तालुक्यात महिलांनी पुढाकार घेलेला नसल्याचे जि. प.च्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

LEAVE A REPLY

*