दरेवाडी दारुकांड प्रकरण : तिघांना 23 पर्यंत पोलीस कोठडी

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील दरेवाडी येथे बनावट दारू प्रकरणात दोघांचा बळी गेला होता. या प्रकरणात पोलिसांनी सबजेलमध्ये असणार्‍या तिघांना अटक केली आहे. या आरोपींना सहायक पोलीस अधिक्षक अक्षय शिंदे यांनी न्यायालयात हजर केले असता, पुढील चौकशीसाठी तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. जीतू गंभीर, मोहन दुग्गल, सोनु दुग्गल अशी आरोपींची नावे आहेत.
नगर तालुक्यातील पांगरमल येथे बनावट दारुमुळे 9 जणांचा मृत्यु झाला होता. तसेच 20 पेक्षा जास्त जणांना विषबाधा झाली होती. हा प्रकार मिथेनॉलमुळे झाल्याचे वैद्यकीय अहवालात उघड झाले होते. दरम्यान या घटनेपुर्वी नगर तालुक्यातील दरेवाडी येथे मद्य प्रशान केल्यामुळे दोघांचा मृत्यु झाला होता. या घटनेची उकल त्यावेळी झाली नाही.
मात्र दोघांच्या शवविच्छेदनाचे अहवाल आल्यानंतर मृत्युचे कारण लक्षात आले. या घटनेची चौकशी केली असता, पोलीस तपासात निष्पन्न झाले की, मयत यांनी प्रशान केलेली दारु जिल्हा रुग्णालयातील कॅन्टीनमधुन घेतली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी भिंगार कॉम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पांगरमल घटनेतील आरोपी जीतू गंभीर, मोहन दुग्गल, सोनु दुग्गल हे मयतांच्या मृत्युस जबाबदार असल्याचे लक्षात आल्यामुळे सहायक पोलीस अधिक्षक अक्षय शिंदे यांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.

सखोल तपास करणार – 
दरेवाडी प्रकरणाचा तपास सुरू आहे. यात प्रथमत: तिघांना अटक करण्यात आली असून त्याना पोलीस कोठडी मिळाली आहे. या घटनेचा सखोल तपास करण्यात येईल. चौकशी दरम्यान अन्य आरोपी असल्यास त्यांना देखील अटक करण्यात येईल. पोलीस कोठडीत या घटनेची उकल होणार आहे.
– अक्षय शिंदे (सहायक पोलीस अधिक्षक)

LEAVE A REPLY

*