अवैध दारु अड्ड्यावर मेहेंदुरीच्या महिलांचा हल्लाबोल

0
इंदोरी (प्रतिनिधी) – तालुक्यातील इंदोरी परिसरात एका घरात अनेक दिवसांपासून देशी दारूची चोरटी विक्री सुरू होती. दारूमुळे परिसरातील अनेक तरुण व नागरिक दारूच्या व्यसनाकडे वळले होते. दारूविक्रीची खबर शेजारील मेहेंदुरी गावातील महिलांना लागली. त्यामुळे महिलांनी एकत्र जमून दारुविक्री सुरू असलेल्या घरात घुसून हजारो रुपयांची देशीदारू हस्तगत केली. महिलांच्या या धाडसीवृत्तीचे तालुक्यात कौतुक आहे.
प्रवरा पट्ट्यातील इंदोरी, मेहेंदुरी, रुंभोडी या गावांमध्ये अनके दिवसांपासून विनापरवाना दारूची विक्री सुरू आहे. मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या दारूबंदी निर्णयामुळे मेहेंदुरी, रुंभोडी या परिसरातील दारुविक्री बंद झाली. परंतु शेजारी असलेल्या इंदोरी गावातील नदी परिसरात असणार्‍या एका गावात लपूनछपून दारूविक्री सुरूच होती.
त्यामुळे या तिन्ही चारही गाव परिसरातील नागरिक व काही तरुण इंदोरीत येऊन दारू पिऊ लागले. या दारूविक्रीची कुणकुण काही दिवसांपूर्वी मेहेंदुरी गावातील महिलावर्गास लागली. त्यामुळे गावातील तरुण वर्गाच्या नेतृत्वाखाली काल गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास महिलांनी इंदोरीत जाऊन सुरू असलेली दारुविक्री थांबवली व घरातून सुमारे दारूचे 7 बॉक्स ताब्यात घेतले.
भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. अविनाश कानवडे, सुनील बंगाळ, साहेबराव आरोटे, सागर चासकर, भरत बंगाळ, रावसाहेब शिंदे, नितीन बंगाळ यांच्या नेतृत्वाखाली सीमा फरगडे, सुमन फरगडे, सविता फरगडे, कल्पना फरगडे, पुष्पा फरगडे, विमल आरोटे, सुशाबाई आरोटे, ताराबाई फरगडे, वर्षा आरोटे, जिजाबाई बंगाळ, पूनम आरोटे, सविता संगारे, नंदा फरगडे, आशा नवले, सीताबाई आरोटे आदी महिलांनी सुरू असलेली दारुविक्री बंद पाडून दारूसाठा पोलिसांना पकडून दिला.
दरम्यान घटनास्थळी बीट हवालदार दिलीप पानसरे व सहकार्‍यांनी धाव घेऊन काही दारू हस्तगत केली तर काही दारूसाठा जागेवर नष्ट केला. दारूविक्रेत्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीसांनी गुरनं. 56/17 महाराष्ट्र पोव्हीजन अ‍ॅक्ट 65 ई, 83 नुसार मिराबाई जिजाबा माळी व गंगाराम जिजाबा माळी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
यावेळी इंदोरीचे पोलीस पाटील अशोक नवले, सरपंच संतोष नवले, विकास देशमुख, किरण गायकवाड, संतु नवले, विकास बंगाळ, सुनील बंगाळ, सुनील आरोटे, भाउसाहेब शिंदे, भाउसाहेब वावळे, संतोष बंगाळ, संतोष चासकर, अजित बंगाळ, नितीन बंगाळ, मच्छिंद्र वावळे, साहेबराव आरोटे, सिध्देश मोहटे, भूषण आरोटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

  या घटनेची पोलिसांना माहिती देऊनही पोलीस एक तास उशीराने घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे ग्रामस्थ व महिलांनी नाराजी व्यक्त केली. दारू हस्तांतरित करतेवेळी दारू विक्रेत्या महिला व मेहेंदुरीच्या महिलांमध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाली. या घराच्या जवळूनच प्रवरा नदी वाहत असल्याने नदीच्या कडेला असलेल्या काटवणात दारूविक्रेते दारू लपून ठेवत असल्याची माहिती समजली आहे.

LEAVE A REPLY

*