निमोण फाटा येथे देशी दारू पकडली

0

दोघांना अटक; 1 लाख 70 हजाराचा मुद्देमाल जप्त

तळेगाव दिघे (वार्ताहर) – संगमनेर तालुक्याच्या हद्दीतील नशिक ते पुणे राष्ट्रीय महामार्गावरून निमोण फाटा शिवारात संगमनेर तालुका पोलिसांच्या पथकाने बेकायदा देशी व विदेशी दारूच्या बॉक्सची वाहतूक करणारी छोटा हत्ती गाडी पकडली. सदर एक लाख किंमतीच्या गाडीसह देशीदारूचे बॉक्स व विदेशी दारूचा एक बॉक्स मिळून एक लाख हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

संगमनेर तालुक्याच्या हद्दीतील नशिक ते पुणे राष्ट्रीय महामार्गावरून निमोण फाटा शिवारात शुक्रवारी सायंकाळी 6.15 वाजेच्या सुमारास एका छोटा हत्ती गाडीतून (क्र. एमएच 12 एचएफ 8325) देशीदारूचे 25 बॉक्स देशी व विदेशी दारूच्या एक बॉक्सची बेकायदा वाहतूक केली जात होती.

याची खबर मिळताच संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अनिल जाधव, आंनद धनवट, शंकर आहेर, पो. कॉ. बाबासाहेब खेडकर यांच्या पथकाने निमोण फाटा शिवारात सदर छोटा हत्ती गाडी अडवली.

पकडलेल्या एक लाख रुपये किंमतीच्या गाडीत 69 हजार 120 रुपये किंमतीची दारू मिळून आली. दारू वाहतूक करणार्‍या बाबासाहेब दत्तु थोरात (वय 34) व वैभव दत्तात्रय गवळी (वय 23 दोघेही रा. वडगावपान ता. संगमनेर) या दोघांना पोलिसांनी अटक केली. पो. कॉ. बाबासाहेब खेडकर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार याप्रकरणी बाबासाहेब दत्तु थोरात व वैभव दत्तात्रय गवळी दोघांविरुद्ध अवैध दारू वाहतूक प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर दारू कोठून कुठे नेली जात होती याचा पोलीस शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

*