श्रीगोंद्यात दरोड्याच्या तयारीत असलेली नगरची टोळी गजाआड

0

6 अटकेत, दोघे पसार, अंगझडतीत तलवार, कटावणी, मिरची पूड हस्तगत

अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीगोंदा शहरात दरोडा टाकण्यासाठी नगर-दौंड रोडने मोटारसायकलवरून जाणार्‍या दरोडेखोरांच्या टोळीला गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास यश आले आहे. या टोळीतील 6 जणांना पोलिसांनी अटक केली असून दोघे पसार होण्यात यशस्वी झाले. या टोळीकडून शस्त्रे हस्तगत करण्यात आले.
2 नोेव्हेॅबर रोजी पोलिस अधिक्षक व अप्पर पोलिस अधिक्षक यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाक श्रीगोंदा भागात फरार व अन्य आरोपींचा शोध घेत होते. त्याचवे्री सपोनि संदीप पाटील यांना खबर्‍यामार्फत ताज्या पाज्या भोसले (रा. सैनिकनगर, भिंगार) हा त्याच्या 7-8 साथीदारांसह नगर-दोैंड रोडने श्रीगोंदा शहराच्या दिशेने मोटार सायकलवरून कोठेतरी दरोडा टाकण्यासाठी येत असल्याची माहिती कळाली.
पाटील यांनी ही माहिती पोनि दिलीप पवार यांच्या कानी घातली. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप पाटील, पोहेकॉ फकीर शेख, सुनील चवहण, नानेकर, पोना विजयकुमार वेठेकर, रवींद्र कर्डिले, मनोहर गोसावी, मल्लिकार्जून बनकर, दिगंबर कारविले, विजय ठोंबरे, पोकॉ सचिन अडबल, सागर सुलाने यांनी नगर-दौंड रोडवरील पारगाव फाटा येथे सापळा लावला.
त्यानंतर काही वेळातच तीन मोटारसायकलवरून 8 तरूण डबलसीट, ट्रिपलसिट बसून नगरहून येताना दिसले. ु सपोनि पाटील यांनी सर्वांना इशारे करून एकाचवेळी रस्त्यावर बोलावून दोन मोटार सायकल थांबविल्या. व 6 जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई सुरू असणाच पाठीमागून येत असणार्‍या दोघांनी या पथकाला हुलकावणी देत दौंडच्या दिशेने भरधाव निघून गेले.
ताब्यात घेतलेल्या तरूणांना नाव पत्ते विचारला असता ताज्या पाज्या भोसले सैनिकनगर, डेअरी फार्मजवळ भिंगार, संदेश ताज्या भोसले रा. सदर, संजय युवराज काळे रा. सदर, तपेश किरण भोसले धानोरा,ता. आष्टी, सुरेश किफावत काळे रा. नांदगाव शिंगवे, जिन्या नाज्या भोसले रा. सदर असल्याचे सांगितले.
ताज्या पाज्या भोसले याने शर्म्या हुरमास काळे, तुषार सावत्या भोसले हे दोघे पळून गेल्यांची नावे सांगितली. या सर्वांची अंगझडती घेतली असता त्यात एक तलवार, लोखंडी कटावणी, 4 तोंडाला बांधण्याचे मास्क, मिरची पूड, दोन मोटारसायधली असा एकूण 40220 रकमेचा मुुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी पुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*