दारणा 60 टक्के भरले!

0
अस्तगाव (वार्ताहर) – दारणाच्या पाणलोटातील इगतपुरी, तसेच घोटी परिसरात पडत असलेल्या मध्यम पावसाने दारणात 24 तासांत 56 दशलक्षघनफूट नवीन पाण्याची आवक झाली. दारणा धरणात काल सायंकाळी 6 वाजता 60 टक्के पाणी साठा झाला होता. भावली 54 टक्के भरले आहे. तर गंगापूर धरणाचा साठा 42.26 टक्क्यांवर स्थिर आहे.
दारणाच्या भिंतीजवळ अवघा 6 मिमी पावसाची नोंद झाली. मात्र पाणलोटातील घोटी येथे 45, इगतपुरी येथे 68 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे दारणात 56 दलघफूट नवीन पाणी दाखल झाले आहे. त्यामुळे हळूहळू दारणाचा साठा वाढत आहे. काल सकाळी या धरणात 4216 दलघफूट पाणीसाठा झाला होता. भावली धरणात 779 दलघफू पाणी साठा झाला आहे. हे धरण 54 टक्के भरले आहे. या धरणाच्या भिंतीजवळ 51 मिमी पावसाची नोंद झाली.
गंगापूर धरणाच्या परिसरातही मध्यम स्वरूपाचा, कधी हालक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे पाण्याची फारशी आवक  होत नाही.

काल सकाळी संपलेल्या 24 तासांत गंगापूरच्या भिंतीजवळ 30 मिमी पावसाची नोंद झाली. आंबोली येथे 30, तर त्रंबक येथे 7 मिमी पावसाची नोंद झाली. 5630 क्षमतेच्या या धरणात 2379 दलघफू पाणी साठा आहे. हे धरण 43 टक्के भरले आहे.
कडवा धरणातून 250 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत आहे. हे धरण 25.96 टक्के भरलेले आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यातून 250 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हा विसर्ग नांदूर मधमेश्‍वर बंधार्‍यात दाखल होत आहे. नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यात नाशिक परिसरातील पावसाचे पाणी दाखल होत आहे. त्यामुळे या बंधार्‍यातून 807 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*