Friday, April 26, 2024
Homeनगरदारणा साठा 71 टक्क्यांवर

दारणा साठा 71 टक्क्यांवर

अस्तगाव|वार्ताहर|Astgav

नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचे आगमन मुसळधार नसले तरी अधून मधून दारणाच्या पाणलोटातील इगतपुरी भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडतो. घाटमाथ्यावरील छोटे मोठे धबधबे सुरू झाल्याने पाण्याची आवक थोडी फार होत आहे. यामुळे काल सकाळी दारणाचा साठा 70.39 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.

- Advertisement -

तर भावलीचा साठा 95.94 टक्क्यांवर पोहचला आहे. एका दमदार पावसात भावली ओव्हरफ्लो होऊ शकेल. तर गंगापूर धरणाचा साठा पाणी वापरामुळे 52.22 वरून काल सकाळी सहा वाजता 51.98 वर आला होता. गंगापूरच्या पाणलोटात पाऊस नाहीच! एकूणच नाशिकच्या धरणांच्या पाणलोटात पावसाने मोठी विश्रांती घेतली आहे.

दारणाच्या पाणलोटातील इगतपुरी येथे काल सकाळी 6 वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासांत 21 मिमी पावसाची नोंद झाली. अन्यत्र पाऊस नाही.

भावलीला 20 मिमी पावसाची नोंद झाली. या 24 तासात दारणात 33 दलघफू नविन पाणी दाखल झाले. तर भावलीत 18 दलघफू नविन पाणी दाखल झाले. 7149 दलघफू क्षमतेच्या दारणात 5032 दलघफू पाणी साठा तयार झाला आहे. हे धरण 70.39 टक्के भरले आहे. 1434 क्षमतेच्या भावलीत 1376 दलघफू पाणी साठा आहे. भावली 95.94 टक्क्े भरले आहे. मुकणे 28.24 टक्के, वाकी 8.52 टक्के, भाम 42.68 टक्के, कडवा 23.22 टक्के असा पाणी साठा आहे.

गंगापूर धरणाच्या पाणलोटात काल सकाळी संपलेल्या 24 तासात अवघा 4 मिमी पावसाची नोंद झाली. अंबोलीला 7 तर त्र्यंबक ला 8 मिमी पावसाची नोंद झाली. 5630 क्षमतेच्या या धरणात 2927 दलघफू पाणीसाठा आहे. या धरणात 51.98 टक्के पाणीसाठा होता. गंगापूर समुहातील धरणांचे साठेही स्थिर आहेत. कश्यपी मध्ये 24.98 टक्के, गौतमी गोदावरी त 21.25 टक्के, आळंदी 0.70 टक्के असे पाणीसाठे आहेत. पालखेड मध्ये 32.21 टक्के, भोजापूर मध्ये 38.50 टक्के पाणीसाठा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या