शिवसेनेची खरी नाराजी जनतेवर

भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचे वक्तव्य

0

शिर्डी, ता. ८ : शिवसेनेची नाराजी आमच्यावर नाही, ती जनतेवर आहे, विधानसभेत शिवसेनेपेक्षा भाजपाला जास्त जागा का दिल्या म्हणून.

जनतेवर व्यक्त करू शकत नाही म्हणून आमच्यावर नाराज होतात… असे वक्तव्य केलेय भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी.

शिर्डी येथे पत्रकारांशी आज त्यांनी पत्रकारांची अनौपचारिक गप्पा मारल्या. शिवसेनेच्या संबंधाबद्दल वरील वक्तव्य करून ते म्हणाले की आम्ही एकत्रच आहोत आणि यापुढेही राहू.

नारायण राणे भाजपात केव्हा येणार यावर त्यांनी राणेंनाच विचारा असा टोमणा मारला.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी राजकीय जोडे बाहेर काढून विरोधकांनी आम्हाला तोडगा सुचवावा आम्ही तो स्वीकारायला तयार आहोत, असेही ते पुढे म्हणाले.

कर्जमाफीच्या विरोधात भाजपा नाही, जोपर्यंत शेतीमध्ये वीज, रस्ते, सिंचन इत्यादी ची शाश्वत गुंतवणुक होत नाही, तो पर्यंत कर्जमाफी केल्याचा काहीही उपयोग होणार नाही.

यापूर्वीच्या सरकारांनी 2 वेळा कर्जमाफी दिली होती, त्याचा फायदा शेतकऱ्याऐवजी बँकांना झाला आहे, आत्महत्या थांबल्या नाहीत. म्हणून आमच्य सरकारचा प्रयत्न शेतकऱ्यांना सक्षम करणे हा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

*