Type to search

नाशिक मुख्य बातम्या

डांगसौंदाणे : कोसळलेल्या जलकुंभ प्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा

Share

डांगसौंदाणे | वार्ताहर

येथील भारत निर्माण योजनेतील 75 हजार लिटर क्षमता असलेला जलकुंभ अवघ्या पाच वर्षात जमीनदोस्त झाल्याने ऐन उन्हाळ्यात डांगसौंदाने वासियांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

प्रशासनाने याची गंभीर दखल घेत संबंधित तांत्रिक सल्लागार व तत्कालीन पदाधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी डांगसौंदाणे ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे यांच्याकडे केली आहे.

या निवेदनाच्या प्रती बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण तहसीलदार जितेंद्र इंगळे ,पोलीस निरीक्षक वासुदेव देसले ,यांना देण्यात आल्या आहेत.

सन 2010 -11 मध्ये भारत निर्माण योजनेतून डांगसौंदाने गावासाठी 42 लक्ष रुपये मंजूर असताना ही योजना तत्कालीन सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यांनी कुठलीही गुणवत्ता न तपासता पूर्ण केली.

जलकुंभाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्याने हा जलकुंभ अवघा पाच वर्षात पडल्याने या कामाचा दर्जा किती निकृष्ट होता. हे दिसून येते.

प्रथमदर्शनी ग्रामपंचायतीचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून संबंधित जबाबदार असणाऱ्या सर्वांवर तात्काळ गुन्हे दाखल करत व या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर सुरेश वाघ, अनंत दीक्षित उदय सोनवणे, विजय सोनवणे, पंकज बधान, सोपान सोनवणे, डॉ. सुधीर सोनवणे कैलास केल्हे, संजय सोनवणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!