दंगल गर्ल चा युरोपच्या रस्त्यांवरचा डान्स व्हायरल

0
मुंबई – ‘दंगल गर्ल्स’ फातिमा सना शेख आणि सानया मल्होत्राची जोडी ‘दंगल’ चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळाली. चित्रपटात कुस्ती खेळत प्रतिस्पर्ध्यांना धुळ चारणारी ही जोडी प्रेक्षकांना फार भावली होती. खऱ्या आयुष्यातही या दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. या जोडीचा एक भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात फातिमा व सानया दोघीही युरोपच्या रस्त्यावर डान्स करताना दिसत आहेत.

आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटात फोगट बहिणींची भूमिका साकारून नावारूपास आलेल्या फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा या दोघी बॉलिवूट नट्या सध्या युरोपच्या टूरवर आहेत. युरोपच्या रस्त्यांवरचा फातिमा व सनाचा एक व्हिडिओ सध्या वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत फातिमा-सना तुफान डान्स करताना दिसताहेत. फातिमाने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओला चाहतेही भरभरून लाईक्स करत आहेत. दंगल चित्रपटानंतर फातिमा तिच्या आगामी ‘ठग्झ ऑफ हिन्दोस्तान’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे, तर सानया ‘पटाखा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. शूटींगच्या कामातून वेळ काढत या दोघीही एकमेकींसोबत वेळ घालवत आहेत.

LEAVE A REPLY

*