#DancePlus3 : श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूरने दिले ‘डान्स प्लस 3’चे ऑडिशन!

0

नृत्यकलेत आवड असल्याचे श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूरने स्पष्ट केले असून एका डान्स रिअॅलिटी शोसाठी तिने ऑडिशनदेखील दिले आहे.

स्टार प्लस वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘डान्स प्लस’ या रिअॅलिटी शोसाठी खुशी कपूरने ऑडिशन दिले आहेत.

कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसोझा यामध्ये परिक्षक असून ‘डान्स प्लस’चे हे तिसरे पर्व आहे. मोठी बहिण जान्हवी कपूरप्रमाणे खुशीची माध्यमांमध्ये फार चर्चा झाली नाही.

त्यामुळे जेव्हा ती ऑडिशन देण्यासाठी आली तेव्हाही तिला कोणी ओळखले नाही. खुशी माध्यमांसमोर क्वचितच झळकली असल्याने श्रीदेवीची मुलगी असल्याचे कोणाला कळलेच नाही.

मात्र टॉप ३५ मध्ये आल्यानंतर रेमोसमोर डान्स करायला जेव्हा खुशी आली, तेव्हा ती श्रीदेवीची मुलगी असल्याचे कळाले.

LEAVE A REPLY

*