दळवट आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे

0

अभोणा (वार्ताहर) ता. १८ – कळवण तालुका विधी सेवा प्राधिकरण व वकील संघ कळवण यांचे संयुक्त विद्यमाने शासकिय आश्रम शाळा दळवट येथे कायदे विषयक शिबीर आयोजीत करण्यात आले होते .

सध्या संगणक व सोशल मिडीया आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. अलीकडे सायबर सुरक्षितता ही गंभीर तसेच चिंताजनक बाब ठरत आहे. याचे कारण संगणकाच्या क्षेत्रातील वाढती गुन्हेगारी या संदर्भातील कायदेविषयक सायबर विषयक मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच शिक्षणाचा अधिकार, महिला अत्याचार व संरक्षण तसेच सायबर सेल नाशिक ग्रामीण बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळवण कोर्टाच्या न्यायाधीश स्वरा पारखी होत्या, तर प्रमुख अतिथी ए आर देवरे, कळवण वकील संघाचे अध्यक्ष अॅड.शशिकांत पवार, अभोणा पोलीस ठाण्याचे सपोनी राहुल फुला हे होते .

LEAVE A REPLY

*