गुजरात : गरबा बघायला आला म्हणून तरूणाची केली हत्या

0

गांधीनगर : गुजरातमधल्या आणंद जिल्ह्यामध्ये रविवारी गरबा बघायला आले म्हणून एका दलित युवकाला मारहाण करून त्याची हत्या केल्याचे वृत्त आहे.

पटेल समाजाच्या तरूणांनी या दलित युवकाला गरबा पाहण्यापासून हटकले आणि मारहाण केली असा आरोप असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

जयेश सोळंकी हा युवक आपला भाऊ व मित्रांसह एका मंदीराजवळ गरबा बघण्यासाठी आला होता. यावेळी एक तरूण आला आणि त्यानं जातिविषयक आक्षेपार्ह शिवीगाळ जयेशला केली. पटेल समाजाच्या या तरुणाने नंतर आणखी काही जणांना बोलावले. दलितांना गरबा बघण्याचा अधिकार नसल्याचे सांगत त्यांच्याविरुद्ध पुन्हा जातीविषयक गरळ ओकण्यात आली.

यावेळी या तरुणांनी जयेशला मारहाणही केली, त्याचे डोके भिंतीवर आपटले. जयेशला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, परंतु तिथेच नंतर त्याचा मृत्यू झाला. सगळ्या आरोपींना अटक करण्यात आली असून चौकशी सुरू आहे.

LEAVE A REPLY

*