नाशिकमध्ये बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा

0
नाशिक | नाशिकमध्ये बौद्ध धर्मगुरू व १४ वे दलाई लामा यांचा ८२ वा वाढदिवस नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. १९५९ मध्ये चीनने तिबेटमध्ये आक्रमण केले.

त्यानंतर दलाई लामा यांना भारताने सहारा दिला, भारतात अनेक ठिकाणी दलाई लामा यांचे समर्थक आहेत. या घटनेला ५८ वर्षे पूर्ण झाली आहेत. आज दलाई लामा यांचा ८२ वा वाढदिवस असल्यामुळे नाशिकमधील तिबेटीयन बांधवांनी लामा यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला.

यावेळी भारताने आम्हाला सहारा दिला त्यामुळेच आज आम्ही आहोत. देश आणि सरकारप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत असे म्हणत तिबेटीयन बांधवांनी आभार मानले.

आज संपूर्ण तिबेटीयन मार्केटला सुट्टी देण्यात आली आहे. विश्वात शांती, सुख नांदो तसेच दलाई लामा यांना दीर्घायुष्य लाभो यासाठ अद्भावना पूजा झाली. तसेच तिबेटीयन पारंपारिक नृत्य सदर करण्यात आली.

प्रारंभी, तिबेटीयन वेलफेयर असोशिएशनचे अध्यक्ष निमा सिचाई यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर प्रमुख अतिथींच्या दीपप्रज्वलन झाले. प्रार्थना होऊन केक कापण्यात आला. दलाई लामा यांचा जीवनपट सांगण्यात आला. त्यानंतर तिबेटीयन पारंपारिक नृत्य पार पडले.

LEAVE A REPLY

*