रोजगार संधी साठी प्रयत्न – सिद्धी पारख

0
सिद्धी पारख
नाशिकला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे आणि आता वाइन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून गोदावरी नदीच्या तटबंदीच्या एका सुंदर नैसर्गिक सेटिंगमध्ये विविध सांस्कृतिक आणि जीवनशैलीतील अनुभव प्रदान केले जातात. उद्योग क्षेत्रासह आर्थिकदृष्ट्या सक्षम ‘मुंबई-पुणे-नाशिक’ हा गोल्डन त्रिकोण सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.

नाशिकमध्ये सद्या अस्तित्वात असलेल्या गुंतवणूकदारांच्या विद्यमान आणि संभाव्य गुंतवणूकदारांना नव्या संधी निर्माण करून देण्याच्या दृष्टीने नियोजन होणे गरजेचे आहे. गुंतवणूक आणि रहिवासी क्षेत्रात विविध रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. त्यावर लक्ष देण्याची गरज आहे.

स्थानिक प्रशासनाने नाशिकला उत्तम पायाभूत सुविधा देताना त्यांच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन नियोजन करणे अपेक्षित आहे. एक शाश्‍वत शहर चालण्यासोबतच सायकल विभागाला समान न्याय मिळणे गरजेचे आहे. ते स्वास्थ्यासोबतच पर्यावरणाचे जतन करणारे क्षेत्र आहे. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. तसेच सुरक्षित शहर म्हणून विकसित करण्याकडे भर देणे गरजेचे आहे.

शहर स्मार्ट होताना त्यांच्या सार्वजनिक वाहतूक सेवांचा प्रामुख्याने विचार केला जातो. त्यामुळे या क्षेत्रात काम करताना अनुभवी यंत्रणा उभारण्यावर लक्ष केंद्रित करावे. खासगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवून शहराच्या तिजोरीवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न व्हावा. सोबतच सेवासुविधा व महसुलात वाढ करावी, खासगी वाहनांसोबतच शहरी मोबिलिटीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

नाशिकला उद्योग नगरीची ओळख दिली जात आहे. त्यादृष्टीने उत्पादन क्षेत्राला विशेष सुविधा देण्यावर भर असणे अपेक्षित आहे. ज्यामुळे रोजगाराच्या संधी वाढणार असून, कामगार व मालक सुरक्षित करणे शक्य होणार आहे. नाशिक विविधतेने नटलेले शहर आहे.

गड, किल्ल्यांसह, धार्मिक कार्यक्रमांसाठी नाशिक विशेष प्रसिद्ध आहे. नाशिक विभागातील विविध स्थांनाचा विचार करून पर्यटनाच्या क्षेत्रात शहरातील उच्च क्षमतेचे प्रदर्शन करून पर्यटकांना आकर्षित केल्यास शहराला आर्थिक बाजूने मजबुती देणारे असू शकते.

यासोबतच शहराच्या सुंदरतेला जपण्याचे काम हे नागरिक म्हणून आपण करणे अपेक्षित आहे. किंबहुना ती आपली जबाबदारी आहे. प्रशासनाद्वारे केले जाणारे काम व त्यावर नागरिकांनी बाळगलेली जागरुकता यामुळे परिसर स्वच्छ व सुंदर राहण्यास मदतच होईल.

प्रत्येक नागरिकाने नाशिकला स्मार्ट करताना आपणही स्मार्ट होणे अपेक्षित आहे. त्यांनी परिसरातील वातावरण स्वच्छ ठेवावे, रहदारी नियमांचे पालन करा आणि नाशिक सीआयए स्मार्ट बनवण्यास मदत करावी.

 

LEAVE A REPLY

*