बांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार

0
राहूल पवार
झपाट्याने विकसित होणार्‍या शहरात मुंबई, पुणे शहरापाठोपाठ नाशिकचे नाव आवर्जून घेतले जाते. धरण, नैसर्गिक नद्या, दर्‍या-डोंगरांनी नटलेलेल्या नाशिकला निसर्गाची देणगी लाभली आहे. धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या शहरात बारा वर्षांनी होणारा कुंभमेळामुळा वरदानच आहे. शहरात मुबलक सुविधा उपलब्ध आहेच, दिवसेंदिवस दळणवळणाच्या सुविधांत वाढ होत असल्याने भविष्यात मुंबई, पुणे नंतर विकासाच्या बाबतीत प्रगतीपथावर असलेल्या शहरात आई टी पार्क, शैक्षणिक केंद्र, औद्योगिक केंद्र, रिअल इस्टेट या क्षेत्रांचा समावेश झाला पाहीजे.
धार्मिक, ऐतिहासिक महत्त्व असलेल्या प्रेक्षणीय स्थळांचे चांगले संगोपन व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट झाल्यास पर्यटनाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते, यादृष्टीने सामूहिक प्रयत्न होणे आवश्यक आहे. मी एक बांधकाम व्यावसायिक असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून क्षेत्राच्या सध्यस्थितीची चांगला अनुभव आहे.
शासनाने लागू केलेले सर्व नवीन नियम व अट यांचे सर्व बांधकाम व्यावसायिकांनी स्वागतच केले आहे. तरी देखील पूर्णत्वाचा व नवीन परवानगी दाखला प्राप्त होण्यास विलंब होतो या कामाला गती मिळाली पाहिजे. पूर्णत्वाच्या दाखल्यामुळे नवीन घरपट्टी व पाणीपट्टीचा मोठ्या प्रमाणावर भरणा प्राप्त होईल, तसेच नवीन बांधकाम परवानगीमार्फत व विविध कर आकारणी होऊन महापालिकेच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात भरणा होईल.
असे झाल्यास बांधकाम व्यवसायाला चांगले दिवस येऊन खरेदी-विक्री मध्ये वाढ होईल. शहरात पुणे व मुंबईतील गुंतवणूक वाढून बांधकाम क्षेत्राला आलेली मरगळ दूर होऊन रोजगाराला चालना मिळेल. मनपा लेआउट फायनल करताना यात रस्ता, ड्रेनेज, लाईट अश्या सुविधा पुरविते. तश्याच प्रकारे लेआउटमधील खुल्या जागेबद्दल ठोस निर्णय घेतला पाहिजे.
खुल्या जागांचे महापालिकेने हस्तांतरण करून यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून तो विकसित केल्यास स्थानिकांना त्याचा उपभोग घेता येईल. शहराला निसर्गाची देणगी लाभली आहे. या निसर्गाचा समतोल राखण्यासाठी शासनस्तरावर प्रदूषणमुक्त गोदावरी, सार्वजनिक स्वच्छता, प्लास्टिक बंदी, वृक्ष संवर्धन, नो हॉर्न डे असे विविध उपक्रम राबवले जात आहे.
यात नागरिकदेखील मोठ्या संख्येने सहभागी होत आहे, मात्र याची सुरुवात प्रत्येकाने स्वत:पासून करताना यात सातत्य राहिल्यास शहराच्या विकासात अधिक भर पडेल.

LEAVE A REPLY

*