हिरवाई जपावी ! – मुकेश मुंदडा

0
मुकेश मुंदडा
नाशिक शहरातील वाहतुकीचा वारंवार होणारा कोंडमारा हा कायमस्वरुपी सुटावा, असे प्रत्येक वाहनधारकच नव्हे तर पादचारी व्यक्तींनाही वाटते. यासाठी दुचाकीधारक, रिक्षाचालक व खासगी छोटे वाहनधारक यांंनी स्वतःपासूनच वाहतुकीचे नियम पाळल्यास ही अडचण येणार नाही. यासाठी प्रत्येक वाहनधारकाने जागरूक राहणे तितकेच गरजेचे आहे .
नाशिक शहरातील मध्यवर्ती भागाबरोबरच कॉलेज रोड, गंगापूर रोडवर युवकांकडून होणारी दुचाकीची रेस ही तर मोठी डोकीदुखी ठरत आहे. यासाठी या तरुणांना ट्रॅफिक सेल्फी शिकविणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीने वाहतुकीचे नियम हे अंगीकारावे आणि त्याप्रमाणे रस्त्याने चालताना नियमांचे पालन करूनच चालणे आवश्यक आहे.
नाशिकच्या विकासासाठी आपण स्वतः नाशिककर म्हणून काय करतो हे पाहताना स्वतःपासूनच या गोष्टी अवलंबिल्या गेल्या पाहिजे. केवळ दुसर्‍यानेच हे करायचे आणि दुसर्‍यावरच अवलंबून राहायचे. हे अत्यंत चुकीचे आहे.
नाशिक शहर ही स्मार्ट सिटी होत आहे. इतर शहरांच्या तुलनेत नाशिकच्या अंतर्गत भागात झाडांचे प्रमाणही भरपूर आहे. ही हिरवाई जपण्याचे काम प्रत्येक नाशिककरानेे करणे गरजेचे आहे.
झाडे वाढविणे संख्येने शक्य नसले तरी किमान आहे ती झाडे, ती हिरवाई मेन्टेनन्स करून जपली तरी भविष्यासाठी ती आपल्याला निश्‍चितच फायदेशीर ठरणार आहे. अन्यथा पुढील पिढीस मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. म्हणून ही हिरवाई जपणे प्रत्येक नाशिककराचे काम नव्हे तर कर्तव्य आहे.
नाशिकमधील स्वच्छतेबाबत बोलायचे म्हटल्यास स्वच्छतेविषयीचे ज्यावेळी कार्यक्रम असतात, त्याचवेळी तो-तो परिसर, रस्ते व त्या-त्या भागातील म्हणजेच कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वच्छता आवर्जुन केली जाते.
मात्र, ही स्वच्छता म्हणजे केवळ कार्यक्रमापूरतीच आणि त्या दिवसांपूरतीच सीमित आहे की काय? असे वाटून जाते. नाशिक शहरातील प्रदूषण वाचवण्यासाठी ‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’ ही जी संकल्पना मांडण्यात आली आहे, तिचा पुरेपूर वापर हा प्रत्येक नाशिककराने करणे गरजेचे आहे. मात्र, तसे काही होत नाही.
सातपूर-त्र्यंबकेश्‍वर मुख्य रस्ता हा तर वाहतूकदारांसाठी मृत्यूचा सापळा बनला असून सद्यस्थितीत या रस्त्यांबरोबरच शहराच्या काही भागात अपघातांची मालिका सुरू आहे.सातपूर रस्त्यावरील एबीपी सर्कल ते हॉटेल संस्कृतीपर्यंत असलेले दुभाजकाचे काम मधील पंक्चर हे तर अपघाताचे मूळ कारण ठरत आहे.
या रस्त्यावर अनावश्यक ठिकाणी पंक्चर कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी शहरवासीयांची आहे. रस्त्यावरील अपघातांचा चढता आलेख बघता वाहतूक शाखेच्यावतीने लोखंडी बॅरिकेट्सच्या सहाय्याने मुख्य रस्त्यावरील पंक्चर बंद करत अपघाताना कंट्रोल करण्याचा प्रयत्न होतो.
मात्र, छोट्या व्यवसायाकांंकडून हे बॅरिकेटिंग बाजूला काढण्यात आले आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे.त्यामुळे शॉर्टकट म्हणून वाहनधारकांसह पादचारी या ठिकाणाहूनच जाण्याचा प्रयत्न करतात. ते अपघाताला आमंत्रण ठरत आहे.

 

LEAVE A REPLY

*