हेरीटेज राईड सुरु करा! – देवांग जानी

0
देवांग जानी
नाशिकची मूळ ओळख गोदावरी नदीमुळे आहे. दंतकथेच्या मान्यतेनुसार शंकर-महादेव ब्रह्म हत्येच्या पाप क्षालनासाठी गोदा किनारी आले. गोदा-अरुणा संगमावर स्नान करून पापमुक्त झाले. श्रीराम वनवासासाठी दंडकारण्य अर्थात नाशकात आले, दैनंदिन स्नानविधी ज्या कुंडात करायचे त्याला आपण रामकुंड संबोधन करतो. आजमितीस हजारोंच्या संख्येत भाविक नाशिक नगरीत धार्मिकविधी, देवदर्शन आणि पर्यटनासाठी येतात. नाशिक नगरीत येणार्‍या भाविक/पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारने हेरीटेज राइड योजना तयार केली पाहिजे.
गोदावरी नदी पात्रातील १७ प्राचीन कुंडाचे महत्त्व, संपूर्ण ब्रह्मांडात नंदी नसलेले एकमेव शिवमंदिर श्री कपालेश्‍वर, प्रत्येक २० आणि २१ मार्चला सूर्याचे पहिले किरण सुंदर नारायणाच्या चरणावर पडते त्याच्या किरणोत्सव सोहळा, सन १७६५ दरम्यान अहिल्यादेवी होळकर पटांगणात नागरिकांचे वाद मिटवण्याचे काम होत असल्याने हे पटांगण अहिल्याबाईंचे कोर्ट म्हणून प्रसिद्ध होते.
अहिल्यादेवी (विक्टोरिया) पुलाखाली गोपिकाबाई पेशवेंच्या बंगला होता. त्याचे अवशेष आजही उपलब्ध आहे. सीता गुंफा ते रामशेज किल्ल्यापर्यंत ९.५ कि.मी.चा भुयार मार्ग असून याच मार्गाने श्रीराम रामशेज किल्ल्यावर विश्रामासाठी जात असल्याचे पुरावे सन १८८३ च्या गेझेटरमध्ये उपलब्ध आहे, जुनी मातीची गढी अर्थात काझी गढीच्या सन १९५२ मध्ये राष्ट्रीय स्मारकच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
पूर्वी गढीवर औरंगजेबाचे कोर्ट भरत असे. सोईल टेस्ट रिपोर्टप्रमाणे गढीच्या मातीत सोन्याचे कण आहेत. नाशिकला रामकालीन, मुघलकालीन, मराठाकालीन, पेशवेकालीन, ब्रिटीशकालीन असा प्रदीर्घ इतिहास असल्याने या ऐतिहासिक वास्तुंबाबत हेरीटेज राइड योजना राज्य सरकारने पुढाकार घेऊन सुरू केली पाहिजे.
यामूळे पर्यटनाला चालना मिळेल स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतील. नाशिकसह नागरिकांची आर्थिक उन्नती होईल. आगामी काळात हेरीटेज सिटीमध्ये नाशिकच्या समावेश होऊ शकतो. त्यासाठी गरज आहे सर्वांनी एकत्र येऊन त्यासाठी पाठपुरावा करण्याची…

LEAVE A REPLY

*