Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : रोजंदारी कर्मचाऱ्यांचे नाशिकमध्ये आंदोलन

Share

नाशिक | प्रतिनिधी

आदिवासी विभाग अंतर्गत चालविण्यात येणार्‍या राज्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा व वसतिगृहातील मागील २० वर्षांपासून अतिदुर्गम भागात घडयाळी तासिकांवर रोजंदारीने काम करणार्‍या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना कायम सेवेत घेण्याचे शासन व प्रशासनाचे आश्वासन फोल ठरवल्याने संतप्त रोजंदारी कर्मचार्‍यांनी आज आदिवासी विकास विभागाच्या नाशिक आयुक्त कार्यालयावर आंदोलन सुरु केले आहे. आंदोलक आणि आयुक्तांमध्ये चर्चा सुरु असून अद्याप कुठलीही माहिती आंदोलनस्थळावरून प्राप्त झालेली नाही.

कायम सेवेत न घेता, कर्मचार्‍यांच्या जागी भर्ती, बदली व पदोन्नतीने नियमित कर्मचारी दिल्याने रोजंदारी कर्मचार्‍यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने ३० एप्रिल २०१६ पुर्वीच्या रोजंदारी कर्मचार्‍यांना तात्काळ नोकरीत विनाअट सुरक्षा प्रदान करणे, कायम सेवेत समावेश करणे, रोजंदारी कर्मचार्‍यांच्या जागी कोणत्याही पद्धतीने बदली भर्ती व पदोन्नतीने पदस्थापना करू नये.

कायम सेवेत समावेश करण्यासाठी रोजंदारी कर्मचार्‍यांनी अनेक वेळा बिर्‍हाड आंदोलन, उपोषण, धरणे आंदोलन केले. परंतु आश्वासनांच्या पलीकडे काहीही मिळाले नसल्याचे आंदोलक सांगत आहेत.

आदिवासी विकास विभागाच्या शासकीय प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा व शासकीय वसतिगृहांमधील अनेक वर्षांपासून रोजंदारीने कार्यरत वर्ग तीन-चार कर्मचार्‍यांचे वारंवार उद्भवणारे प्रश्न, समस्या सोडविणे कर्मचार्‍यांना कायम सेवेत सामावून घेण्यासाठी अनेक आंदोलन केले.

शासकीय माध्यमिक आश्रम शाळा व वसतिगृहात गेल्या २० वर्षांपासून दीड हजार कर्मचारी अतिदुर्गम भागात ज्ञानदानाचे व विद्यार्थ्याचे संगोपनाचे करण्याचे काम रोजंदारीने करीत आहेत. वस्तीशाळा, ग्रामविकास, वन विभाग, आरोग्य विभाग इतर विभागातील मानधन कर्मचार्‍यांना कायम सेवेत घेण्यात आले. त्या आधारे आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतील कर्मचार्‍यांना देखील कायम सेवेत घ्यावे अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!