
देशात महिला व पुरुषांना बरोबरीचे स्थान आहे. पंरतु,आजही काही भागात स्त्रियांवर अत्याचार केला जातो. ते थांबविण्यासाठी स्त्रियांनी तसेच आपण सर्वांनी तिच्या स्वत:च्या हक्कासाठी लढले पाहिजे. स्त्रियांचे सशक्तीकरण म्हणजेच स्त्रियांचा संपूर्ण विकास. स्त्रिया आणि संपत्ती नियोजन या विषयावर दैनिक देशदूतच्या वतीने आयोजित गुंतवणूक सल्लागार मुकेश चोथानी यांची विशेष ब्लॉग सिरीज भेटीला येत आहे. दर रविवारी या सिरीजचा एक स्पेशल पॉडकास्ट स्त्रियांना ऐकण्यास मिळणार असून आज पहिला भाग सादर करत आहोत...