Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यामराठा आरक्षणासाठी बोलके आंदोलन

मराठा आरक्षणासाठी बोलके आंदोलन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मराठा समाजाला ज्या सवलती दिल्या गेल्या पाहिजेत त्या हे सरकार द्यायला तयार नाही. तसेच आरक्षणाचा विषय सुद्धा गांभीर्याने घ्यायला तयार नाही. म्हणून आम्ही आता आंदोलनाचे हत्यार उपसले असून प्रत्येक जिल्ह्यात आता मोर्चे काढणार आहे. सर्व आंदोलने बोलकी असेल, मूक आंदोलन करण्यात येणार नाही.

- Advertisement -

येत्या काळामध्ये जर सरकारने ठोस भूमिका जाहीर केली नाही, तर पावसाळी अधिवेशन सुद्धा आम्ही चालू देणार नाही, असा इशारा शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिला.

नगर येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी राजन वाघ, सुरेश शेटे, नवनाथ इसरवाडे आदी उपस्थित होते. मेटे म्हणाले की, येत्या आठ दिवसांमध्ये निवृत्त न्यायाधीश यांची कमिटी स्थापन करून आम्ही आगामी काळामध्ये कशा पद्धतीने संघर्ष करायचा याचा निर्णय त्या कमिटीच्या माध्यमातून घेणार आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे भविष्याचे प्रश्न आता निर्माण झालेले आहे.

त्यामुळे आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. म्हणून आता जिल्ह्यामध्ये आम्ही मेळावे घेणार असून त्याची सुरुवात लवकरच करणार आहे. येत्या 27 जून रोजी आम्ही मुंबई येथे दहा हजार दुचाकी रॅली विधानभवनावर घेऊन जाणार आहे. जे जे मराठी नेते आमदार हे प्रत्येक पक्षांमध्ये आहेत, त्यांनी गांभीर्याने घ्यावे. जर शासनाने 5 जुलै पर्यंत निर्णय घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नसल्याचे मेटे यांनी यावेळी सांगितले.

दिल्लीत काय झाले जाहीरपणे सांगा

राज्याचे मुख्यमंत्री मंत्रिमंडळातील इतर सहकार्‍यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीमध्ये गेले होते. वास्तविक पाहता त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जातो, असे सांगितले. मात्र हे एवढेच नाही तर सतरा विषय घेऊन गेले. एकप्रकारे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा कांगावा केला आहे, असा आरोप मेटे यांनी केला. तुम्ही दिल्लीत गेला मग काय झाले, हे जनतेला जाहीरपणे सांगा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या