आजच्या घडामोडी

संदल-ए-खास इस्लामी पद्धतीने

करोनामुळे भाविकांना प्रवेश नाही; घरोघर फातेहा पठण

Farooque Pathan

Farooque Pathan

जुने नाशिक | Old Nashik (प्रतिनिधी) :

जगभरातील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले शहेंशाह-ए- नासिक पीर सय्यद सादिक शाह हुसैनी यांचा ३९१वा संदल-ए-खासचा छोटखानी विधी आज (दि. ६) सायंकाळी इस्लामी पद्धतीने झाला. यंदा प्रथमच करोनामुळेे सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.

विश्वस्त मंडळी व निवडक भाविकांनी धार्मिक पद्धतीने बंंद दरवाजात संदलचा विधी पार पाडला. भाविकांनी बडी दर्गाह शरीफ परिसरात गर्दी न करता आपल्या घरात फातेहा पठण करावेे, असे आवाहन विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.

आज सायंकाळी असरच्या नमाजा नंतर लोबान व मगरीब नमाजानंतर संदलचा विधी झाला, परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी बंद होते.

करोना हद्दपार होण्यासाठी विशेष प्रार्थना झाली. संदलनिमित बडी दर्गा शरीफ परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

हा दर्गाह सर्व धर्मियांसाठी नेहमी खुला असला तरी करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून शासनादेशा प्रमाणे मागील सुमारे पाच महिन्यांपासून दर्गा शरीफचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com