पार्थ पवारांच्या ट्वीटवर राष्ट्रवादी नेत्यांचा संयम
आजच्या घडामोडी

पार्थ पवारांच्या ट्वीटवर राष्ट्रवादी नेत्यांचा संयम

पत्रकांराना नमस्कार करत सूचक मौन पाळले

Kishor Apte

Kishor Apte

मुंबई :

सुशांत प्रकरणावरून पार्थ पवार यांनी पुन्हा टविट केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नेत्यांनी यावर संयम आणि सावधगिरीचा पवित्रा घेतला आहे. दरम्यान, खा. सुप्रिया सुळे यांनी आज मंत्रालयात अजित पवार यांची भेट घेऊन वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा केली.

बारामती मतदारसंघातील सासवड गावाला स्वच्छतेचा दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, मला त्याचा सार्थ अभिमान आहे. असे त्या म्हणाल्या. तिथले नगराध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याबरोबर अजित पवारांची भेट घेतली आणि त्यांचा सत्कार केला. लावणी कलाकारांच्या प्रश्नावरही त्यांच्याशी चर्चा केली. राज्यात व्यायामशाळा आणि जिम सुरु करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे, त्या सुरू कराव्या अशी आपलीही मागणी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांची भेट घेतल्यावर सांगितले. मात्र पार्थ पवारांच्या नव्या सत्यमेव जयते या व्टिटवर प्रतिक्रिया विचारल्यानंतर त्यांनी पत्रकांराना नमस्कार करत सूचक मौन पाळले आणि निघून गेल्या. दरम्यान पार्थच्या ट्विटचा अर्थ कुणी कसाही लावू शकतो, अशी सावध प्रतिक्रिया पवार घराण्याचे दुसरे नातू आणि पार्थ यांचे चुलत बंधू रोहित पवार यांनी दिली. पार्थ यांच्या त्या प्रतिक्रियेमुळे राष्ट्रवादी पक्षाला काही नुकसान होईल, असे वाटत नसल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी दिली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com