नगरमध्ये पाण्याची बोंबाबोंब

नगरमध्ये पाण्याची बोंबाबोंब

ऐन पावसाळ्यात नगरकरांच्या घशाला कोरड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या आठ दिवसांपासून नगर शहरात (Nagar City) ऐन पावसाळ्यात पाण्याची बोंबाबोंब (Water problem) सुरू आहे. वीज पुरवठा खंडीत (Power outage) होत असल्याने नगर शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला असल्याचे महापालिकेने (Municipal Corporation) म्हणणे आहे. शुक्रवारी पहाटे पुन्हा वीज पुरवठा खंडीत झाल्याने शहराला पाणी पुरवठा होऊ शकला नाही. यामुळे ऐन पावसाळ्या नगरकरांच्या घशाला कोरड पडली आहे.

नगर शहराला मुळा धरणातून (Mula Dam) पाणी पुरवठा होतो. काही मिनिटे वीज खंडीत झाली तरी त्याचा पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो. 26 जुनपासून आजपर्यंत 11 वेळेस पाणी पुरवठा योजनेची लाईट गायब झाली. गुरूवारी रात्री ते शुक्रवारी सकाळपर्यंत तीन ते सात लाईट गेल्याने आज शहराला पाणी पुरवठाच झाला नाही. वीज वितरण कंपनीमुळे शहराचा पाणी पुरवठा खंडीत झाल्याचे सांगत महापालिकेने सगळी जबाबदारी वीज वितरण कंपनीवर ढकलली आहे.

मुळानगर, नागापूर आणि विळद येथे पाणी पुरवठा योजनेचे पंपिंग स्टेशन आहे. वीज खंडीत झाल्याने शहर पाणी पुरवठा योजनेवर परिणाम होतो. त्यामुळे नियमीत व अखंडित वीज पुरवठा होण्याबाबत वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अिायंत्यांना महापालिकेने पत्रव्यवहार केला. मात्र तरीही सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com