Tuesday, April 23, 2024
Homeजळगावमुक्ताईनगरच्या माजी सभापतींची हत्या सुपारी देऊनच

मुक्ताईनगरच्या माजी सभापतींची हत्या सुपारी देऊनच

जळगाव -मुक्ताईनगरातील पंचायत समितीचे माजी सभापती दिनकर पाटील यांची हत्या सुपारी देऊनच केल्याचा उलगडा झाला आहे. कोणतेही पुरावे नसताना अवघ्या काही तासात पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून आरोपींना अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलीस अधिक्षक पुढे म्हणाले की, घटनास्थळावरून सीसीटीव्ही फूटेज मिळाले होते. मात्र संशयितांनी मास्क परिधान केल्याने चेहरा ओळख अवघड होते. त्यामुळे गुन्हेगारांना शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके या सलग तीन दिवस घटनास्थळी तळ ठोकून होत्या. दरम्यान, या तपासासाठी विविध पथकांची देखील नियुक्ती करण्यात आली होती. याठिकाणी तपासासाठी सायबर सेलची देखील मदत घेण्यात आली होती. कुठलाही सबळ पुरावा नसताना अवघ्या काही तासात या गुन्हयात पोलिसांनी सहा संशयीतांना अटक करण्यात यश मिळाले आहे. पोलिसांच्या सांघिक कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी पोलिसांचे कौतुक केले.

- Advertisement -

17 जूनच्या रात्री 2.30 ते पहाटे पाच वाजेच्या दरम्यान मुक्ताईनगर पंचायत समितीचे माजी सभापती दिनकर पाटील हे झोपलेले असताना शस्त्राने गळ्यावर वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. सदर खून पूर्व वैमनस्यातून झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. उगले तसेच अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांना मिळाली. त्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांना सुचित करून गाईड लाईन देण्यात आल्या होत्या. संशयीतांचा शोध घेण्याकामी तांत्रिक बाबीं तपासणे आवश्यक होते. त्यासाठी सायबर पोलीस स्टेशनप्रमाणे याठिकाणी समांतर असे लहान सायबर सेल कार्यान्वित करण्यात आले होते. विविध पथके व त्यांना जबाबदारी वरीष्ठांनी निश्चित करून दिली. या पथकांनी सखोल तपासाला गती दिली. या प्रकरणात तेजस भास्करराव पाटील, विलास रामकृष्ण महाजन या दोघींनी गावातील वर्चस्व टिकवण्याच्या हेतूने सय्यद साबीर सय्यद शफीक, निलेश इश्वर गुरचळ, अमोल मुरलीधर लवंगे यांना 2 लाख पन्नास हजारांची सुपारी देऊन खून केल्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना 27 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याचेही पोलीस अधिक्षकांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या