<p>शिंदखेडा तालुक्यातील अमराळे येथील शेतकर्यांने पपई या पिकाला भाव मिळत नसल्याने तसेच शेतामधून माल बाहेर काढण्यासाठी रस्ता नसल्याने नाराजी व्यक्त करत थेट पपई पिकावरच रोटावेटर फिरविला. हाताशी आलेले संपुर्ण एक एकरावरील पपई पिक नष्ट केले.</p>