व्यापार्‍याची 34 लाखात फसवणूक

चालकासह धुळ्यातील दोघांवर गुन्हा
व्यापार्‍याची 34 लाखात फसवणूक

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

कलकत्ता येथे पोहोचविण्याठी दिलेला एसीचा माल तालुक्यातील तिखी शिवारात उतरवून त्यांची परस्पर विक्री करून पुण्यातील व्यापार्‍याची 34 लाखात फसवणूक करण्यात आली.

याप्रकरणी चालकासह धुळ्यातील दोघांवर मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यापारी अशोक पूजन यादव (रा. शिवश्रृष्टी पार्क, प्लॉट नं. 142, बिल्डींग ई, विगंफॅलट नंबर 301,एमएनजीएल गॅस पंपाजवळ, चिखली, पुणे) यांनी दि. 12 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कंटेनरवरील (क्र.एमएच 14 जीडी 1810) चालक अबरार इस्तीयाक खान (वय 32 रा. टांडाकला, बलुआ, चंदौली, उत्तरप्रदेश) याला 34 लाख 59 हजार 105 रूपये किंमतीचे वोल्टास कंपनीचे एसी कलकत्ता येथे पोहोचविण्यासाठी दिले होते.

मात्र त्याने प्रवासात सर्व एसीचे इनडोअर व आऊटडोअर युनिट हे तिखी (ता. धुळे) शिवारातील हनुमान धर्माजी गवळी (रा. लळींग ता. धुळे) यांच्या शेतात दि. 13 रोजी मनोज उर्फ बाबा अभिमन बळसाणे (रा. भाईजी नगर ता. धुळे) यांच्या सांगण्यावरून त्यांच्याशी संगणमत करून उतरविले. तसेच तो कुणालातरी विक्री केला. अशी फिर्याद त्यांनी मोहाडी पोलिसात दिली आहे.

त्यानुसार तिघांनी व्यापार्‍यासह डिलीव्हरी प्रा. लि. कंपनीची 34 लाख 59 हजार 105 रूपयात फसवणूक केली. त्यावरून वरील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पीएसआय मिर्झा करीत आहेत. त्यांनी पोलिसांनी तिघांचा कसुन शोधही सुरू केला आहे.

दरम्यान मोहाडी पोलिसांनी चार दिवसांपुर्वीच लळींग शिवारातून एका संशयीताकडून पाच लाखांचे एसी जप्त केले आहे. ते याच गुन्ह्यात असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com