अस्तगाव पुन्हा 3 दिवस लॉकडाऊन

अस्तगाव पुन्हा 3 दिवस लॉकडाऊन

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

करोनाच्या पार्श्वभुमिवर अस्तगाव नुकतेच पाच दिवस संपुर्ण लॉकडाऊन घेतले होते. करोनाचा संसर्ग वाढत असल्याने आज सोमवारपासून पुन्हा तीन दिवस संपुर्ण लॉकडाऊन घेण्यात येणार आहे.

अस्तगाव येथे 21 दिवसात 11 जणांचा करोनाने मृत्यु झाला आहे. गावठाणात तर दोन दिवसात तिघांचा मृत्यु झाला. दिवसेंदिवस करोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने विकएंडला जोडून वैद्यकिय अधिकार्‍यांच्या सल्ल्याने ग्रामसुरक्षा समितीने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज सोमवार दि. 26 ते 29 एप्रिलपर्यंत 3 दिवस लॉकडाऊन घेण्यात येणार आहे.

या काळात फक्त दवाखाने व मेडिकल सुरु राहतील. याशिवाय दूध संकलन केंद्र सकाळी 7 ते 8 व सायंकाळी 6 ते 8 असे सुरु राहतील. गुरुवारी लॉकडाऊन संपल्यानंतर शासकिय नियमाप्रमाणे किराणा दुकान व अन्य आवश्यक सेवा सकाळी 7 ते 11 यावेळेत सुरु राहील.

सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे गरजेचे असताना काही दूध संकलन केंद्रावरील कर्मचारी दूध संकलन करतांना तोंडाला मास्क लावत नसल्याचे दिसुन आले आहे. या दूध संकलन केंद्र चालकांना करोना ग्रामसुरक्षा समितीने समज द्यावी. तसेच दूध केंद्रावर अथवा जवळ दूध उत्पादक सकाळी गप्पा मारतांना दिसुन येतात. राहाता पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com