दहिहंडी हा साहसी खेळच!

0
नाशिक | दहिहंडी हा साहसी खेळ आहे असा युक्तीवाद राज्य सरकाने उच्च न्यायालयात केल्यानंतर त्यावर उच्च न्यायालयाने साहसी खेळ म्हणजे नेमकं काय असा प्रतिप्रश्न राज्य सरकारला केला आहे.

याबाबत आयोजकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता दहिहंडीला म्हणजेचे मानवी मनोरयांना परेशात साहसी खेळांची मान्यता मिळाली असून आपल्याकडे न्यायालयात बाजू मांडण्यात सरकार कमी पडल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्यात.

मागील काही वर्षात दहिहंडी खेळात मृत्यूमुखी पडणारया तसेच अपघात होवून अपंग होण्याचे प्रकार वाढल्यानंतर या खेळावर मर्यादा आल्या. मानवी थर कमी करण्यापासून तर आयोजकांकडून खेळाडूंचा विमा उतरविणे तसेच बक्षिसांवरही काही प्रमाणात बंधने लागू करण्यात आली. एका जनहित याचिकेत तर दहिहंडीवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

त्यानंतर राज्य सरकारनेही न्यायालयात आपली बाजू मांडली. यात राज्य सरकाने दहिहंडी हा एक साहसी क्रिडा प्रकार असल्याचे न्यायालयात सांगितल्यानंतर उच्च न्यायालयाने यावर साहसी क्रिडा प्रकार म्हणजे नेमकं काय असा युक्तीवाद केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दहिहंडीवर चर्चा सुरू झाली आहे.

मानवी मनोरे रचून आठव्या किंवा नवव्या किंवा दहाव्या थरावर लहान मुलाला जीव धोक्यात घालून उभे करणे यात कोणता साहसी क्रिडा प्रकार आहे असे न्यायालयाने स्पष्ट करून त्याबाबत सरकारला जाब विचारला आहे. यावर सरकारने अजून बाजू मांडलेली नाही.

परंतु आयोजकांमध्ये न्यायालयाच्या या प्रश्नाबाबत उत्सुकता आहे. परदेशात मानवी मनोरयांना साहसी क्रिडा प्रकारांची मान्यता मिळालेली आहे परंतु भारतात नाही. हा भारताचा पारंपारिक सण आहे. परंत सरकार बाजू मांडण्यात कुठेतरी कमी पडत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या खेळात सहभागी होणारया गोविंदा पथकांमध्येही काही प्रमाणात नाराजी असून त्यांनाही दहिहंडी पुर्वीप्रमाणे उत्साहात, साहसात साजरी केली जावे असे वाटते. नाशिकच्या आयेाजकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतली असतां त्यांनीही सरकार बाजू मांडण्यात कमी पडत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

LEAVE A REPLY

*