जिल्ह्यात दहीहंडी उत्साहात

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- आमदार संग्राम जगताप यांच्या ‘प्रेरणे’ंनंतर माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या ‘श्रीयोग’ने नगरात डिजेचा ‘आवाज’ करत दहिहंडीच्या कार्यक्रमातून ताकद आजमावली. समन्वयातून दहिहंडीचा काला झाला असला तरी त्यातून दोघांनीही शक्तीप्रदर्शन करीत आगामी राजकीय वाटचालीचे संकेत दिल्याची चर्चा शहरात रंगली. विशेष म्हणजे दोघांच्याही दहिहंडीचा काला लुटलेले पथक मुंबई निवासी होते. त्यामुळे ही चर्चा आणखीच खमंग पध्दतीने सुरू झाली. नगर शहरात दहिहंडीचा ‘संग्राम’ चांगलाच रंगत असून गोविंदांवर बक्षीसांचा ‘अभिषेक’ झाल्याने काल्याचा शेवटही गोड झाला.
आमदार संग्राम जगताप व माजी महापौर अभिषेक कळमकर हे दोघेही राष्ट्रवादीचे शहरातील उमलते युवा नेतृत्व आहे. दोघांचीही राजकीय वाटचाल वेगाने सुरू आहे. त्यासाठीच दोघेही महत्वाकांक्षी आहेत. मात्र मनातील आवाज कळमकर ओठावर येऊ देत नाही, इतकाच काय तो फरक. ‘प्रेरणा प्रतिष्ठान’च्या माध्यमातूनच संग्राम जगताप यांचे नेतृत्व घडले. कळमकर यांचेही सावेडी उपनगरात श्रीयोग प्रतिष्ठान आहे. याच प्रतिष्ठानच्या माध्यमातून अभिषेक कळमकर यांनी दहिहंडीचे निमित्त साधून शक्तीप्रदर्शन करत आजमावलेली ताकद त्यांच्या समर्थकांना जोश देणारी ठरली.
जगताप गत चार वर्षापासून दहिहंडीचा कार्यक्रम घेतात, पण कळमकर यांनी यंदा प्रथमच दहिहंडी लावत त्यावर 51 हजार रुपयांचे बक्षीसही लावले. बक्षीसाच्या रकमेत कळमकरांपेक्षा जगताप वरचढ असले तरीही कळमकर यांच्या दहिहंडीची चर्चा मात्र नगरात विविध तर्कविर्तकांना आमंत्रण देणारी ठरली. अभिषेक-संग्राम यांच्या शक्तीप्रदर्शनात दादांची मात्र ओढताण झाली. अर्थात त्यांनी दोघांच्याही काल्याला हजेरी लावली, हा भाग अलहिदा. आमदार जगताप हे ‘श्रीयोग’च्या स्टेजवर दोनदा आले, त्यानंतर अभिषेकचीही पावले मग ‘प्रेरणे’च्या दिशेने पडली.
24 महिन्यांवर विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. त्यावेळी कोणाच्या खांद्यावर कोणाचा झेंडा असेल हे आता सांगणे कठीण आहे. त्याची पायाभरणी मात्र आतापासूनच सुरू आहे. त्याचेच फलित कालचा काला असावा असा तर्क लावला जात आहे. जगतापांविषयी राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू आहे. या सगळ्यांचा ते इन्कार करत असले तरी या चर्चा मात्र बंद होत नाहीत. त्यामुळेच कमळकर यांचे नाव चर्चेत येते. या चर्चेला कालाच्या काल्याने फोडणी दिली, हे नाकारून चालणार नाही.
रयत शिक्षण संस्थेच्या कौन्सिल सदस्यपदी निवड झाल्यानंतर शहराच्या विविध भागात कळमकर यांचा कौतूक सोहळा सुरू आहे. काही सोहळ्यास जगतापही त्यांच्याबरोबरीने स्टेजवर होते. मात्र हा कौतूक सोहळा म्हणजे कळमकरांची पायाभरणी (संघटन बांधणी) तर नाहीना अशी चर्चा सुरू आहे.

दहिहंडी उत्सवात नियमांचे उल्लंघन करत ध्वनी प्रदुषण केल्याने प्रेरणा प्रतिष्ठान व श्रीयोग प्रतिष्ठान या मंडळाचे डिजे जप्त करून आयोजाकांवर कारवाई करण्यात आली आहे. आमदार संग्राम जगताप समर्थक बाबासाहेब गाडळकर, माजी महापौर तथा नगरसेवक अभिषेक बाळासाहेब कळमकर, मंगेश अरूण थोरवे, दुर्गेश मोहन अनवने, संतोष काशीनाथ काकडे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाने आवाज कमी करण्यास सांगून देखील आयोजकांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे रात्री 10 च्या सुमारास प्रेरणा प्रतिष्ठान व श्रीयोग प्रतिष्ठानच्या व्यासपीठावर साऊंड, बेस, मिक्सर, माईक, जनरेटर असे लाखो रूपयांचे डिजेचे सामान जप्त करण्यात आले. या प्रकरणी महाराष्ट्र पोलिस अ‍ॅक्ट, पर्यावरण कायदा 1986(19) प्रमाणे तोफखाना व कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कोपरगाव (प्रतिनिधी)– कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या दहीहंडी उत्सवामध्ये जय महाकाल ग्रुप, ऑल एकता सोशल फौंडेशन, नगरसेवक संदीप पगारे मित्र मंडळ, गगन हाडा मित्र मंडळ, हिंदू सम्राट तरूण मंडळ, माता वैष्णव देवी ग्रुप, नवाज कुरेशी ऑल एकता फौंडेशन, बाला गंगुले मित्र मंडळ, गुरुदत्त युवक संघटना, जय बजरंग तरूण मंडळ संजय नगर, हिंदुराज तरूण मंडळ, मावला ग्रुप, युवा प्रतिष्ठान गांधीनगर, अक्सा ग्रुप, हनुमान नगर मित्र मंडळ, वीर सम्राट ग्रुप, आर्यन ग्रुप आदी मंडळांच्या युवा कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
दहीहंडी फोडणार्‍या मंडळासाठी जवळपास अर्ध्या लाखापेक्षा जास्त रकमेची बक्षीस ठेवण्यात आली होती. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला. अनेक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उंच थर लावून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला परंतू एकाही मंडळाला ही दहीहंडी फोडण्यात यश आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विकासाच्या संकल्पना घेवून उभारण्यात आलेली विकासाची दहीहंडी युवा नेते आशुतोष काळे यांनी फोडली. यशस्वी चार थर लावणार्‍या बजरंग तरूण मंडळाला पाच हजार रुपयांचे बक्षीस आशुतोष काळे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव संदीप वर्पे, उपजिल्हाध्यक्ष दीपक साळुंके, शहराध्यक्ष सुनील गंगुले, विजयराव आढाव, नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, हिरामण कहार, कोपरगाव जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार, उपाध्यक्ष सचिन आव्हाड, जी.प. सदस्य प्रसाद साबळे. दिनार कुदळे, कृष्णा आढाव, डॉ. चन्द्रशेखर आव्हाड, डॉ. तुषार गलांडे, डॉ. दीपक पगारे, कार्याध्यक्ष संतोष चवंडके, सुनिल बोरा, अजगर खाटिक, बाळासाहेब रुइकर, विजय चवंडके, राजेंद्र जोशी, दिनकर खरे, दिनेश पवार, अशोक आव्हाटे, इम्तियाज अत्तार, विकास बेद्रे, रावसाहेब साठे, राजेंद्र बोरावके, लक्ष्मण सताळे, मुकुंद इंगळे, प्रशांत वाबळे, सुरेश सोनटक्के, मनोज कडू, रघुनाथ मोरे, बाळासाहेब शिंदे, नितीन बनसोडे, रविंद्र राउत, हारून शेख, राजेंद्र आभाळे, भरत आढाव, नवाज कुरेशी, प्रसाद आढाव, तुषार सरोदे, शिवा लकारे, मच्छिंद्र सोनवणे, विजय नागरे, संदीप सावतडकर, जनार्दन शिंदे, रंगनाथ टिळेकर, निलेश रुईकर, प्रसाद उदावंत, मनोज गायकवाड, शपीक शेख,किशोर वाघ, विकी जोशी, चन्द्रशेखर म्हस्के, निखील डांगे, रमेश गवळी, राहुल देवळालीकर, बाला गंगुले, गोरख पंडोरे, कुलदीप लवांडे, गणेश लकारे, धनंजय लकारे, योगेश जगताप, चांदभाई पठान, वाल्मिक लाहीरे, संतोष टोरपे, संजय बचाटे, नारायण लांडगे,बिलालभाई पठान, शिवराम निकम, सतीश शिंदे, रसीद शेख, जावेद शेख, अशोक लांडगे, रहेमान कुरेशी, सचिन परदेशी, कैलास मंजुळ, प्रकाश जोशी, संकेत कडवे, महेश उगले, सचिन बढे, विशाल निकम, भावेश थोरात, रविंद्र आहेर, स्वप्नील पवार, तेजस साबळे, साईनाथ लांडगे, सचिन पगारे, रवी हारळे, कार्तिक सरदार, गौतम खंडीझोड आदी मान्यवर उपस्थित होते.

कोपरगाव (प्रतिनिधी)- भारतीय जनता युवा मोर्चा, संजीवनी युवा प्रतिष्ठाण, वैभव आढाव मित्र फाऊंडेशन व दत्ता काले जय तुळजा भवानी मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने मानाची शिवछत्रपती महाराज दहिहंडीचे आयोजन करण्यांत आले होते. ही दहिहंडी जय महेश्वर संजयनगर व मनसेच्या सोनार वस्ती धारणगांव मित्र मंडळांने फोडली. या दोन्ही विजेत्या संघांना प्रत्येकी अकरा हजार रूपयांचे बक्षिस सन्मानचिन्ह कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
प्रारंभी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास हार घालुन या दहिहंडीचा शुभारंभ करण्यात आला. यात 20 गोविंदा पथकांनी सहभाग नोंदविला. तीन व चार थर रचणार्‍या गोविंदा पथकांना मावळा गृप (3 हजार), अक्सा ग्रुप (3 हजार), हिंदु हृदय सम्राट (5 हजार), हनुमाननगर (5 हजार) व जय बजरंगबली मित्र मंडळास (5 हजार) याप्रमाणे बक्षिसांचे वितरण करण्यात आले. विवेक कोल्हे म्हणाले तरूणाईच्या उत्साहाला प्रतिसाद देवुन साहसपुर्ण दहिहंडीचे थर रचणार्‍या कोपरगावच्या गोविंदांचा सर्वत्र लौकीक आहे. युवकांमध्ये खेळाची सांघिक भावना निर्माण व्हावी यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठाण दरवर्षी असे उपक्रम राबवित असते. या दहिहंडीस भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, शहराध्यक्ष कैलास खैरे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पानगव्हाणे, महावीर दगडे, योगेश बागुल, गटनेते रविंद्र पाठक, उपनगराध्यक्ष विजय वाजे, माजी नगराध्यक्ष बबनराव वाजे, पराग संधान, राहुल सुर्यवंशी, दत्ता काले, राजेंद्र सोनवणे, नगरसेवक स्वप्नील निखाडे, सत्येन मुंदडा, आदिनाथ ढाकणे, मेहमुद सय्यद, अनिल जाधव, जनार्दन कदम, अरिफ कुरेशी, रहिम शेख, वैभव आढाव, वैभव गिरमे, दिपक जपे, संजय पवार, फिरोज पठाण, माजी सभापती सुनिल देवकर, बाळासाहेब आढाव, सचिन सिनकर, सतिष रानोडे, नारायण गवळी, फकिर महंमद पहिलवान, रवि रोहमारे, प्रदिप नवले, बाळासाहेब नरोडे, रविंद्र लचुरे, विकी मंजुळ, शिवाजी खांडेकर, दिनेश कांबळे, गोपी गायकवाड, मोहित गंगवाल, अमित जैन आदींसह विविध संस्थांचे आजी माजी प्रतिनिधी अध्यक्ष उपाध्यक्ष शहरातील हौशी गोविंदा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- गोकुळाष्टमीनिमित्त मंगळवारी शंभराहून अधिक दहीहंड्या फोडण्याचा मान शिर्डीतील साईभक्तांसह गोपाळांनी शांततामय वातावरणात व उत्साहात पार पडला. या कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी गोपाळांचे आभार मानले.
शिर्डीत कृष्णाजन्माष्टमी निमित्ताने शहराच्या प्रमुख पेठेत शंभराहून अधिक दहीहंड्या बांधण्यात आल्या होत्या. यात क्रांतीयुवक व सन्मित्र मंडळाच्यावतीने 26 हंड्या बांधण्यात आल्या तर भाजयुमोचे तालुका उपाध्यक्ष साईराज कोते मित्रमंडळाच्या 25, शिवसेना हिंदगर्जना, जयमहाराष्ट्र यांच्या 21, शंभुशासन मित्रमंडळाच्या 10 तर मानाची मनसेची 1 अशा शंभराहून जास्त दहीहंड्या मंगळवारी सायं. 4 वाजेनंतर हजारो गोपाळांच्या उपस्थितीत फोडण्यात आल्या. साई मंदिराशेजारील हनुमान मंदिरापासून दहीहंडी फोडण्यास प्रारंभ झाला. साईबाबांचा नामघोष करत अनेक गोपाळांनी बँडच्या तालावर नाचत एक एक करीत दहीहंड्या फोडण्याचा मान पटकावला. यामध्ये क्रांतीयुवक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सचिन तांबे यांच्या नेतृत्वाखाली गोपाळांनी चार थर लावून जय महाराष्ट्र ग्रुप व सन्मित्र मंडळाची इनामाची दहीहंडी फोडून पारितोषिक मिळविले. तसेच बजाव ग्रुप आणि साईराज मित्रमंडळाच्या गोपाळांनी पाच थर लावून गावातील मानाच्या दहीहंड्या फोडल्या. यामध्ये मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते यांनी 1 लाख 11 हजार इनामाची तर भाजयुमोचे उपतालुकाप्रमुख साईराज कोते यांची 11 हजार 36 रुपयांची दहीहंडी फोडण्याचा प्रताप केला. पो.नि. प्रताप इंगळे यांनी दहीहंडी उत्सव शांततेत व उत्साहात पार पाडल्याबद्दल सर्व गोपाळांचे आभार मानले.

कुकाणा (वार्ताहर)- येथील स्व. भाऊसाहेब देशमुख वाचनालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहीहंडी स्पर्धेचे पहिले 10 हजार 101 रुपयांचे बक्षीस व फिरती ढाल अंतरवालीच्या शामिंदरबाबा गोविंदा मंडळाने पहिल्याच प्रयत्नात पाच थर रचून पटकावली.
15 वर्षापासून सुरू करून स्वर्गीय भाऊसाहेब देशमुख सार्वजनिक वाचनालय हा उपक्रम राबवत आहे. युवकांनी संघटन कौशल्य व संघ भावना वाढवून एकत्रित येऊन हे उत्सव साजरे केले पाहिजे. असे आवाहन यावेळी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी केले. दहीहंडी बक्षीस समारंभ प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच भाऊसाहेब फोलाणे, संयोजन समितीचे प्रमुख अ‍ॅड. हिम्मतसिंह देशमुख, माजी सरपंच दौलतराव देशमुख, तरवडी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक चौधरी, बबनराव पिसोटे, कुकाणा ग्राम सेवा मंडळाचे सहसचिव शिवाजी गरड, बबनराव लाडंगे, बाळासाहेब कचरे, नारायण कासार, शेषराव गर्जे आदी व्यासपीठावर होते. स्वागत व प्रास्ताविक प्रा. मच्छिंद्र भोसले यांनी केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन नेवासा पंचायत समिती सभापती सुनिताताई गडाख यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसभापती राजनंदिनी मंडलिक, सरपंच उज्ज्वला भोसले, संयोजन समितीचे प्रमुख अ‍ॅड. हिम्मतसिंह देशमुख, ग्रामपंचायत सदस्या अपूर्वा गर्जे, नंदा गरड आदी उपस्थित होते. या दहीहंडी उत्सव स्पर्धेत एकूण 13 गोविंदा मंडळांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेसाठी पंच म्हणून क्रीडा शिक्षक नंदकिशोर देशमुख, प्रा. देविदास अंग्रख, चंद्रकांत कचरे, अभिजीत तावरे, अण्णासाहेब कावरे, कारभारी गोर्डे, राम जाधव आदिनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

*