Type to search

जळगाव राजकीय

दहिगाव : आदर्श विद्यालयात मतदान जनजागृती

Share

दहिगाव, ता.यावल । वार्ताहर

येथील आदर्श विद्यालयाने मतदार जागृतीसाठी दि.5 ते 18 ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रम आयोजित केले. त्यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांचे पालकांना मतदान करण्याविषयी आवाहन पत्र लेखन, पालक सभा, माता-पालक सभा, दि.9 व 18 ऑक्टोबर रोजी ग्रामफेरी व पथनाठ्य, दि.9 ऑक्टोबर रोजी निबंध स्पर्धा, दि.10 ऑक्टोबर रोजी रांगोळी व चित्रकला स्पर्धा, पालकांकडून संकल्प पत्र लिहून घेणे इ.उप

क्रम घेतले गेले.

पथनाट्यात इ.8 वीच्या शारदा गजरे, मंजुळा बारेला, धनश्री पाटील, किती महाजन, जान्हवी पाटील, शेख परवेज, वैभव बारेला, नदिम पटेल, यश महाजन, विकास बारेला, मोहिम बाविस्कर यांनी उत्कृष्ठ अभिनय केला. पथनाट्य लेखन दिग्दर्शन पी.बी.पाटील व ए.ए.पाटील यांनी केले. निबंध स्पर्धा डी.जे.ठाकरे, डी.आर.महाजन, डी.ए.तळेले, एस.एस.सोनवणे, एन.डी.पाटील, आर.आर.चौधरी यांनी घेतली.

उपक्रमास शाळेचे चेअरमन सुरेश देवराम पाटील, मुख्याध्यापक एस.डी.चौधरी, पर्यवेक्षक जी.एस.पाटील यांनी कौतुक करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रिडा शिक्षक एम.आर.महाजन, इतर सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेत्तरांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमांना केंद्रप्रमुख विजय ठाकुर यांनी वेळोवेळी भेटी देऊन उपक्रमांचा आढावा घेतला.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!