Type to search

ब्लॉग

Blog : चक्रिवादळे… उंबरठ्यावर!

Share

ऐन दिवाळीत आलेल्या मुसळधार पावसाने राज्यभर धुमाकूळ घातला आहे. दसरा संपल्यानंतर थंडी वाढण्यासाठी सुरुवात झाली होती अन् अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली. हा पाऊस परतीचा नसुन अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात चक्रिवादळाची परिस्थिती निर्माण झाल्याने असा फटका बसला आहे.

आजच्या परिस्थितीत भारतीय उपखंडातील तिनही समुद्रात चक्रवाताची परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे येत्या आठवड्यात दोन ते तीन चक्रिवादळाची निर्मिती होईल असे दिसते आहे. चक्रिवादळाच्या संख्येत अचानक वाढ दिसुन येते आहे.

गेल्या एकवीस ऑक्टोबर रोजी माझ्या अंदाजाप्रमाणे दक्षिण पश्चिम भारतात तसेच अरबी समुद्रात ( मंगलोर च्या पश्चिम समुद्रात) चक्रवात निर्माण होत आहे असे सांगितले होते.

आज दिनांक २५ ऑक्टोबर रोजी चक्रवाताचे ‘क्यार‘ या चक्रिवादळात रुपांतर झाले असुन उद्या सकाळ पर्यंत संपूर्ण गोवा राज्य व उत्तर कर्नाटक किनारपट्टीवर मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे .

‘क्यार’ चक्रिवादळाची दिशा लक्षात घेता उद्या दुपार नंतर हे वादळ पश्चिम दिशेला सरकुन अरबी समुद्रात तीव्र स्वरुप धारण करणार आहे

व त्याचा मार्गक्रमण ओमान च्या दक्षिण दिशेने असणार असुन दिनांक ३० ऑक्टोबर रोजी ओमान किनारपट्टी जवळ धडकणार आहे.

नवीन चक्रवात…

उद्या दिनांक २६ ऑक्टोबर रोजी दक्षिण चेन्नई च्या पुर्व समुद्रात ( बंगाल च्या उपसागरात) नवीन चक्रवाताची परिस्थिती निर्माण होत आहे.

पुढील दोन तीन दिवसात याच्या तिव्रतेत वाढ होईल व संपूर्ण तामिळनाडू आणि केरळ सह श्रीलंका प्रदेशावर मोठ्या प्रमाणावर पावसाचा फटका बसणार आहे.

हा चक्रवात आणखी तीव्र होऊन याचे ‘महा‘ या चक्रिवादळात रुपांतर होईल. चक्रिवादळ असे नामकरण करण्यात आले आहे. बंगालच्या उपसागरातील हे चक्रिवादळ आता हिंद महासागरात दाखल होईल व

आणखी तीव्र होऊन ते ओमान च्या दिशेने प्रवास करणार आहे.

थंडीत अचानक वाढ अपेक्षित…

उत्तर व मध्य भारतात दाखल झालेली थंडी अद्याप महाराष्ट्रात दाखल झाली नाही. सध्या सुरु असलेल्या ‘कायर’ चक्रिवादळाने ही स्थिती निर्माण केली आहे. उद्या सकाळ पर्यंत ‘क्यार’ हे गोव्याच्या पश्चिम किनारपट्टी जवळ असणार आहे यामुळे उत्तर दिशेने वाहणारे वारे दक्षिण पश्चिम दिशेला सरकतील,

यामुळे थंडी घेऊन येणारे पश्चिमी विक्षोपीय वारे अर्थात ध्रुविय वारे महाराष्ट्रात दाखल होतील व थंडी मध्ये अचानक वाढ अपेक्षित आहे.

किमान तापमानात चार ते पाच अंशांची घट अपेक्षित आहे.

‘दिवाळीची’ ढगाळ सुरुवात…

उत्तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आता पावसाचा जोर कमी झालेला आहे मात्र उर्वरित महाराष्ट्रात अद्याप ही वातावरण ढगाळ आहे. दिवाळी सनाची सुरूवात ढगाळ असेल असे दिसते आहे. मात्र ‘क्यार’ चक्रिवादळाची दिशा लक्षात घेता.. दिवाळी सुखरूप पणे पार पडेल असे दिसते आहे..

ऐन दिवाळीच्या सुरूवातीला पावसाने जरी थैमान घातले असले तरी दिवाळीच्या उत्तरार्धात थंडीचे आगमन झालेले असणार आहे. मात्र पावसा कडून थंडी कडे जात असताना दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील भागात गारपीट अपेक्षित आहे.

लेखक, श्रीनिवास औंधकर,
संचालक,
एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र, औरंगाबाद

चक्रिवादळे… उंबरठ्यावर ! !

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!