‘तितली’ किनारपट्टीवर धडकले; आंध्र प्रदेशमध्ये दोघांचा मृत्यू

0
भुवनेश्वर: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तितली या चक्रीवादळाने भयानक रुप घेतले आहे. या वादळामुळे ओडिशाच्या किनारपट्टीवर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी सकाळी ओडिशातील गोपालपूरमध्ये या वादळाचे भयानक स्वरुप पाहायला मिळाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरात अनेक झाडे कोसळली आहेत आणि विजेचे खांब पडले आहेत.
गुरुवारी (11 ऑक्टोबर) हे वादळ ओडिशातील गोपाळपूर आणि आंध्र प्रदेशातील कलिंगापत्तनमच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकले. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हे वादळ 165 किलोमीटर प्रतितास वेगाने किनापट्टीकडे येत आहे. यामुळे ओडिशाच्या किनारपट्टीवर 145 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. राज्य सरकारने 18 जिल्ह्यात रेड अलर्ट दिला आहे.ओडिशामध्ये प्रशासनाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत जवळपास 3 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

तितली हे चक्रीवादळ भयंकर असून बंगालच्या खाडीतील दक्षिण आणि पश्चिम मध्य क्षेत्राला या वादळाचा फटका बसला आहे. गोव्यावरही या चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 12 ऑक्टोबरपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

*