Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राला चक्रीवादळाचा धोका

महाराष्ट्राला चक्रीवादळाचा धोका

मुंबई –

निसर्ग चक्रीवादळानंतर आता महाराष्ट्राला आणखी एका चक्रीवादळाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात

- Advertisement -

कमी दाबाचा पट्टा निर्माण हेात असून, येत्या 24 तासांत तो रूद्र रूप धारण करू शकतो, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने सोमवारी दिली. या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्या प्रभावामुळे आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, मध्य महाराष्ट्र आणि ओडिशा या राज्यांच्या किनारपट्टी भागांमध्ये 20 सेमीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावाने विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी वर्तवली आहे.

कमी दाबाचा पट्टा हळूहळू आंध्रप्रदेशचा उत्तरी किनारपट्टी नरसपूर ते विशाखापट्टणम् हा भाग पार करेल. सध्या त्याची वाटचाल पश्चिम आणि वायव्य दिशेने होत आहे. आंध्रप्रदेश आणि तेलंगणा व्यतिरिक्त उत्तर कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि ओडिशाच्या अंतर्गत भागात उद्या मंगळवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्याच्या दबावामुळे पुढील आठवड्यात नैऋत्य मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता कमी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या