सायबर क्राईमची कार्यशाळा

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर जिल्हा गुन्हेगारीत अव्वल आहे. तसेच तो सायबर गुन्हेगारीत देखील पुढे चालला आहे. रोज दोन गुन्हे सायबर क्राईमचे घडत आहेत.
त्यात विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे पोलिसांकडून शाळा महाविद्यालयात सायबर क्राईमचे धडे देण्यात आले आहेत. बुधवारी (दि.9) न्यू आर्ट कॉलेजमध्ये पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक किर्ती पाटील, एम. एस. कस्तुरे, एस. एस. निंबाळकर यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य बी. एच. झावरे प्रा. अरुण गांगुर्डे उपस्थित होते. प्रा. दीपाली जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. प्रविण कुलकर्णी यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

*