Type to search

Breaking News क्रीडा मुख्य बातम्या

विश्वचषक २०१९ : आयसीसीच्या नियमानुसार सहा ऐवजी ‘त्या’ पाचच धावा; पंचाचा निर्णय चुकीचा : सायमन टॉफेल

Share

लॉर्डस : विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडला हरवून इंग्लंडला प्रथमच जग्गजेतेपदाचा मान मिळाला. शेवटच्या षटकात मार्टिन गुप्टिलच्या फेकेलेला चेंडू दुसरी धाव पूर्ण करताना बेन स्टोक्सच्या बॅटला स्पर्शून गेल्यानं सीमापार झाला. यावेळी पंचानी ६ धावा इंग्लंडच्या खात्यात दिल्या.

या अंपायरांच्या या निर्णयावर पाच वेळा आयसीसी अंपायर ऑफ द ईयर पुरस्कार जिंकणाऱ्या सायमन टॉफेल यांनी टीका केली आहे. ते म्हणाले कि, सामन्यातील दुसऱ्या डावातीळ शेवटच्या षटकात इंग्लंडला मिळालेले ६ रन चुकीचे आहेत. कारण आयसीसीच्या नियमांनुसार, इंग्लंडला ६धावांच्या ऐवजी पाच धावा मिळाल्या पाहिजेत, कारण दोन फलंदाज धाव घेतांना एकमेकांना क्रॉस करू शकले नाहीत.

विश्वचषक २०१९ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना २४१ धावा लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करतांना इंग्लंडच्या संघास शेवटच्या ओव्हरमध्ये १५ धावा आवश्यक होत्या. या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर बेन स्टोक्स ने फटका मारल्यानंतर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मार्टिन गुप्टिल ने स्टॅम्पकडे थ्रो केला. यावेळी बेन स्टोक्सच्या बॅटचा कडा घेत चेंडू सीमापार गेला. दरम्यान अंपायरने दोन धावा आणि चौकार अशा ६ धावा इंग्लंडच्या खात्यात जमा केल्या. सायमन टोफेल यांच्या मते अम्पायरचा हा निर्णय चुकीचा होता.

काय आहे आयसीसीचा नियम?

आयसीसीच्या नियम १९. ८ च्या अनुसार जर ओव्हर थ्रोच्या वेळी चेंडू सीमापार गेला तर पेनल्टी रनांसोबत खेळाडूंनी काढलेल्या धावा देखील मोजल्या जातात. जर फलंदाजांनी एक धाव पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेसाठी धावत असतांना त्यावेळी हे पाहिले जाते कि, क्षेत्ररक्षक करणाऱ्या खेळाडूने दोघे फलंदाज क्रॉस करण्यापूर्वी थ्रो केला का? नाही तर ती एकच धाव संघाला किंवा खेळाडूला मिळते. बाकी पेनल्टीच्या स्वरूपात चार धावा मिळतात.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!