Type to search

Breaking News क्रीडा मुख्य बातम्या

आज ठरणार विश्वचषक २०१९ चा नवा विजेता

Share

लॉर्ड्स : इंग्लंडमध्ये ३० मे ते १४ जुलै २०१९ दरम्यान ४७ सामन्यांचा थरार क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळाला. विश्वचषक उंचावण्यासाठी ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंग्लंड या तीन संघांना विजयाचे प्रबळ दावेदार समजले जात होते. यापैंकी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ उपांत्य सामन्यात पराभूत होऊन मायदेशी परतले आहेत. परंतु आज विश्वचषक २०१९ नवा विजेता ठरणार असल्याने सर्व क्रिकेटप्रेमींना याची उत्सुकता लागली आहे.

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा हा १२ वा हंगाम आहे. विंडीजने आणि भारताने २ वेळा स्पर्धा जिंकली आहे. तर ऑस्ट्रेलियाने ५ वेळा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. तर पाकिस्तान आणि श्रीलंका या संघानी १ वेळा विजेतेपद जिंकले आहे. पण इंग्लंड आणि न्यूझीलंड संघाला अद्याप विजेतेपदाचे खाते उघडता आलेले नाही.

साखळी लढतीत दोन्ही संघांच्या कामगिरीवर नजर टाकली तर, इंग्लंडने ९ सामन्यांमध्ये ६ विजय आणि ३ पराभवांसह १२ गुणांनीं तिसरे स्थान गाठले होते तर न्यूझीलंडने ५ विजय तीन पराभव आणि १ अनिर्णित सामन्यासह ११ गुणांनीं चौथे स्थान गाठले आहे. न्यूझीलंडपेक्षा इंग्लंडचे पारडे विजेतेपदासाठी जड मानले जात आहे.

इंग्लंड संघाच्या फलंदाजीत जॉनी बेरस्टो, जेसन रॉय, जो रूट, ईऑन मॉर्गन उत्तम फॉर्मात आहेत. अष्टपैलू बेन स्ट्रोक्सही चांगली कामगिरी करत आहे. गोलंदाजीत मार्क वूड, आदिल रशीद, बेन स्ट्रोक्स, लियम प्लंकेट असे पर्याय इंग्लंडकडे आहेत.

न्यूझीलंड संघाबद्दल सांगायचे झाले तर, केन विलियम्सन, रॉस टेलर सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. पण टॉम लेथम, मार्टिन गप्टिलची बॅट अद्याप शांत आहे. अष्टपैलूंमध्ये जेम्स निशम, डी ग्रॅडहोम, मिचेल सॅन्टेनर आहेत. गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री, लोकी फेर्गसन, ईश सोधी, जेम्स निशम आहेत. हा सामना लॉर्ड्सच्या केनिग्तान ओव्हल मैदानावर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता खेळवण्यात येणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टारवर करण्यात येणार आहे.

या मैदानावरील सर्वाधिक धावसंख्या इंग्लंड ३३४-४ इंग्लंड विरुद्ध भारत ७ जून १९७५, नीचांकी धावसंख्या दक्षिण आफ्रिका १०७ विरुद्ध इंग्लंड १२ जुलै २००३ सर्वात मोठा विजय इंग्लंड २०२ धावांनी विरुद्ध भारत, निसटता विजय पाकिस्तान २ धावांनी विरुद्ध इंग्लंड १२ जून २००१.

सर्वाधिक धावा मार्कस स्टोयनीस, १३ सामने ५९५ धावा, सर्वाधिक स्कोर १३७ सरासरी ४९. ५८शतके ३ २ अर्धशतके
सर्वाधिक बळी मुस्तफिजूर रहेमान १० षटके ० निर्धाव ७५ धावा ५ विकेट्स
आमनेसामने ९०- इंग्लंड विजयी ४१, न्यूझीलंड विजयी ४३, २ अनिर्णित, ४ निकाल नाही.

विश्वचषकात सामने ९- न्यूझीलंड विजयी ५, इंग्लंड विजयी ४.
विश्वचषकात सर्वाधिक धावा १० सामने ५४९ धावा जो रूट इंग्लंड, ८ सामने ५४८ धावा केन विलियम्सन न्यूझीलंड

-सलिल परांजपे, न्यू जर्सी, अमेरिका

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!