Type to search

Breaking News क्रीडा मुख्य बातम्या

भारत आणि इंग्लंड दरम्यान विश्वचषकाचा अंतिम सामना : सुंदर पिचाई

Share

नवी दिल्ली : यंदाच्या विश्वचषकाचे यजमानपद लाभलेल्या इंग्लंडमध्ये पावसाच्या सावटामुळे सामन्यांची रंगत कमी होत चालली आहे. दरम्यान फायनलला अजून अवकाश असतांना गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एक भाकीत केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार यंदाच्या फायनल भारत आणि इंग्लंड या दोन संघात होणार असून विराट कोहलीच्या टीम इंडियाने या अंतिम सामन्यात इंग्लंडला नमवून विश्वचषक जिंकावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

इंग्लडमध्ये होत असलेल्या विश्वचषक स्पर्धा कोण जिंकणार याची सर्वांनाच उत्सुकता असून यंदा भारताबरोबर इंग्लंड, आस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज हे संघ देखील विजयाचे दावेदार आहेत.

यूएसआईबीसी च्या ‘इंडिया आयडियाज समिट’ कार्यक्रमात सुंदर पिचाई बोलत होते. ते म्हणाले कि, यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारत आणि यजमान इंग्लंडमध्ये अंतिम सामना रंगेल. विराट कोहलीचा संघ फॉर्मात असून तो इंग्लड संघावर मत करेल. यावेळी अनेक संघ तुल्यबळ आहेत त्यामुळे शेवटपर्यत हे चित्र बदलण्याची शक्यता राहील.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!