Type to search

Breaking News मुख्य बातम्या

अन्नाला कुठलीही जात नसते; झोमॅटोच्या भन्नाट उत्तराने नेटकरी खुश

Share

वृत्तसंस्था : ऑनलाइन ऑर्डर केलेले जेवण पोहोचवण्यासाठी मुस्लिम तरुण आल्याचे कारण पुढे करत ऑर्डर रद्द केल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत एका ग्राहकाने ट्वीट करून माहिती दिली. त्यानंतर, झोमॅटोकडून या ग्राहकाला अन्नाला कुठलीही जात नसते असे उत्तर देण्यात आले. झोमॅटोच्या उत्तराने नेटकरी चांगलेच खुश झाले आहेत.

जेवणाची ऑर्डर केल्यानंतर कंपनीकडून डिलिव्हरीसाठी मुस्लिम तरुणाला पाठवल्याचे एका हिंदू व्यक्तीच्या लक्षात आले. त्यानतंर त्याने ही ऑर्डर रद्द करण्याचा इशारा ट्विटरद्वारे झोमॅटोला दिला होता.

त्यावर आम्ही डिलिव्हरी बॉय बदलणार नाही असे झोमॅटोने स्पष्ट केले. या व्यक्तीने त्याची ऑर्डर रद्द केली आणि पुन्हा एकदा झोमॅटोला ट्विटरद्वारे मला माझे पैसे देखील परत नको पण मी ऑर्डर रद्द करत आहे असे सांगितले. त्यावर झोमॅटोने भन्नाट उत्तर या व्यक्तीला देत त्याची बोलती बंद केली.

पंडीत अमित शुक्ला नावाच्या एका ट्विटर युजरने झोमॅटोवरून जेवणाची ऑर्डर दिली होती. त्यानंतर झोमॅटोकडून आलेल्या मेसेजमध्ये जेवण पोहोचवण्यासाठी मुस्लिम तरुण येणार असल्याचं कळताच त्यांनी झोमॅटोकडे तक्रार केली आणि ऑर्डर रद्द केली.

त्यावर झोमॅटोने ‘अन्नाला धर्म नसतो, अन्न हाच धर्म असतो’ अशा आशयाचे ट्विट केले. झोमॅटोने दिलेलं हे उत्तर नेटकऱ्यांना देखील चांगलंच पसंतीस उतरले असून झोमॅटोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!