भारत, नेपाळमध्ये संस्कृतीक बंध : तोरडी; गो. ए. सोसायटीतील गुणवंतांचा सन्मान

0
नाशिक । भारत आणि नेपाळ ही दोन वेगळी राष्ट्रे असली तरी त्यांचा आत्मा एक आहे. दोन्ही देशांमध्ये सलोख्याचे सबंध राहीले आहे. भारतामुळेच नेपाळचा विकास झाला आहे. दोन्ही देशाची संस्कृती मिळतीजुळती असून भारताविषयी नेपाळच्या मनात नेहमीच आदरभाव आहे. भारताला आशिया खंडाचे नेतृत्व करण्याचा मान मिळायला हवा, अशी इच्छा नेपाळच्या उपाध्यक्षांचे प्रमुख सल्लागार महावीर तोरडी यांनी व्यक्त केली.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित उपक्रमात ते बोलत होते. यावेळी गोखले एज्युकेशन सोसायटी व नेपाळ येथील समरसता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेतील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी होते.

महावीर तोरडी म्हणाले, सुमारे शंभर वर्षापासून संस्था कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देवून संस्था जगभरात विवबंधुत्वाचा संदेश पोहोचवण्याचे कार्य करेल असा आशावाद व्यक्त केला.

डॉ. गोसावी म्हणाले, शताब्दी वर्षात संस्था शिक्षणामध्ये अनेक नवीन उपक्रम आणि प्रकल्प राबवण्याचा संकल्प करत आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवण्याचा प्रयत्नशिल आहे. शिक्षणातून सर्वांगीण विकास होऊ शकतो तसेच निर्भयता हा संस्कृतीचा पाया असल्याचे त्यांनी सांगीतले.

प्रसंगी संस्थेतील 90 गुणवंत आजी-माजी विद्यार्थी व प्राध्यापक, प्राचार्य, उपप्राचार्य, आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी यांनी शताब्दी वर्षातील विविध उपक्रमांचा आढावा घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे विभागीय सचिव प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय मुंबई विभागाच्या विभागीय सचिव डॉ. सुहासिनी संत यांनी करून दिला.

कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. आर. जे. गुजराथी, व्यवस्थापन संचालक शैलेश गोसावी, डॉ. दीप्ती देशपांडे काठमांडू येथील प्रदीप शर्मा, संस्थेचे प्रकल्प अधिकारी पी. एम. देशपांडे, डॉ. के. आर. शिंपी, प्रा. बी. देवराज, प्रा. डॉ. खंडेलवाल, उपप्राचार्या डॉ. कविता पाटील, प्रा. साधना देशमुख, डॉ. मोहिनी पेटकर, डॉ. आर. पी. देशपांडे, उद्योजक प्रशांत खांबासवाडकर, आर. जे. भूषण मतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. प्रणव रत्नपारखी व प्रा. मुग्धा जोशी तर आभार प्राचार्य डॉ. पी. सी. कुलकर्णी यांनी मानले.

LEAVE A REPLY

*