#CT2017: ICC चॅम्पियन्स ट्राॅफी अाजपासून: टीम इंडिया प्रबळ दावेदार

0

अायसीसीच्या चॅम्पियन्स ट्राॅफीला गुरुवारपासून इंग्लंडमध्ये सुरुवात हाेत अाहे.

यजमान इंग्लंड अाणि बांगलादेश यांच्यात स्पर्धेचा सलामी सामना रंगणार अाहे. गत चॅम्पियन टीम इंडिया अाणि अाॅस्ट्रेलियाला यंदा जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात अाहे. या दाेन्ही संघांनी अातापर्यंत या स्पर्धेची ट्राॅफी प्रत्येकी दाेन वेळा जिंकली अाहे.

मात्र, यजमान इंग्लंडचाही विजेतेपदासाठी प्रबळ दावा अाहे. कारण इंग्लंडने नुकतीच दक्षिण अाफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका जिंकली. त्यामुळे यजमान टीमवरही सर्वांची नजर असेल.

येत्या १८ जून राेजी या स्पर्धेची फायनल रंगणार अाहे. मात्र, सर्वाधिक चाहत्यांची नजर त्यापूर्वी हाेणाऱ्या भारत अाणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर असेल. ४ जून राेजी हे दाेन्ही पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी समाेरासमाेर असतील.

या एकमेव सामन्याची सर्वाधिक तिकिटे विकली गेली अाहेत.

इंग्लंड-बांगलादेश अाज सलामी सामना; प्रक्षेपण दु. ३.०० वाजेपासून 

 

LEAVE A REPLY

*