#CT17 : भारत-पाक सामन्याला विजय मल्ल्याची उपस्थिती

0

इंग्लंडच्या एजबस्टन स्टेडियममध्ये झालेल्या भारत आणि पाकिस्तानमधला हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी विजय मल्ल्या स्टेडियममध्ये हजर होता.

देशभरातील प्रमुख बँकांना जवळपास 9 हजार कोटींचा चुना लावून लंडनमध्ये पळालेल्या विजय मल्ल्याला अखेर फरार घोषित करण्यात आलं आहे.

त्याला भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

त्याला स्कॉटलंड पोलिसांनीही काही दिवसांपूर्वी अटक केली होती. पण काही तासातच त्याला जामीन मिळाला होता. पण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनिमित्त तो एजबस्टन मैदानात प्रेक्षकांमध्ये बसल्याचं कॅमेऱ्यानं टिपलं आहे.

यावेळी त्याची सुनील गावस्कर यांनीही भेट घेतली. त्याचे फोटो ट्विटरवर ट्रोल होत आहेत.

LEAVE A REPLY

*