#CT17: ऑस्ट्रेलिया- बांगलादेश सामनाही पावसामुळे रद्द, कांगारूंना इंग्लंडविरूद्धचा सामना जिंकावाच लागणार

0

सोमवारी झालेल्या बांगलादेश-ऑस्ट्रेलिया लढत पावसाने रद्द करण्यात आली.

यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ असे गुण देण्यात आले.

ऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा सामना पावसात वाहून गेल्याने कांगारूंचे या स्पर्धेतील भवितव्य टांगणीला लागले आहे.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील लढत पावसामुळे अनिर्णित अवस्थेत राहिली होती.

त्यावेळीही दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण द्यावे लागले होते.

आता कांगारूंना यजमान इंग्लंडविरूद्धचा सामना जिंकावाच लागेल सोबतच नशिबाची साथ मिळावी लागेल.

तरच त्यांचे स्पर्धेतील आव्हान कायम राहू शकते. इंग्लंडविरूद्ध जर कांगारूंचा पराभव झाला तर त्यांना थेट घरचा रस्ता धरावा लागेल.

LEAVE A REPLY

*