#CT17: ए.बी. डिव्हिलिअर्स अनफिट; टीम इंडियासाठी आनंदाची बातमी

0
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि दक्षिण अफ्रीका संघांत रविवारी ओव्हलच्या मैदानावर निर्णायक सामना खेळवला जाणार आहे.
या सामन्याआधी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे. दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज आणि कर्णधार ए.बी. डिव्हिलिअर्स या सामन्यासाठी अनफिट असल्याचे वृत्त आहे.
पाकिस्तानविरोधात झालेल्या सामन्यामध्ये डिव्हिलिअर्स दुखापतग्रस्त झाला होता.
रविवारच्या मॅचआधी म्हणजे आज डिव्हिलिअर्सची फिटनेस टेस्ट घेतली जाणार आहे. क्रिकेट साउथ अफ्रीकेनेही डिव्हिलिअर्सची फिटनेस टेस्ट होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
त्यानंतर तो भारताविरुद्ध खेळणार की नाही हे स्पष्ट होईल.
भारत आणि दक्षिण अफ्रीका संघांत रविवारी होणारा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. हा सामना जिंकणा-या संघाचा उपांत्य फेरीतील प्रवेश नक्की होणार आहे तर पराभूत संघ मालिकेतून बाहेर पडेल.

LEAVE A REPLY

*